येतंय व्हाट्सअॅपचं नादखुळं फीचर : चला पोस्ट करा तुमचं स्टेटस...

           व्हाट्सअॅप... आजच्या माणसाची जणू मुलभूत गरजच! येत्या २४ तारखेला या व्हाट्सअॅपला ८ वर्षे पूर्ण होतायत. आणि गरजेनुसार सतत नाविन्यपूर्ण बदल करण्याच्या धोरणामुळं व्हाट्सअॅप अल्पशा कालावधीत एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचलंय.

          सांगायचं हेच होतं की व्हाट्सअॅपने आपल्याला आता आणखी एक धांसू  फिचर देऊ केलंय ; स्टेटस पोस्टिंगचं. एक मिनिट, हा तो Busy, Available, Sleeping वाला स्टेटस नव्हे बरं का. या नव्या स्टेटस मध्ये तुमच्या स्टेटसला शब्द मर्यादा नसणार आहे.

          तेव्हा या नव्या फीचरमुळं आता तुम्ही व्हाट्सअॅप वर फोटो, इमोजी, डूडल्स, GIF अॅनिमेशन्स, व्हिडिओ, किंवा एखादं टेक्स्ट लिहून ते पोस्ट करू शकता. पण हे स्टेटस फक्त २४ तासांसाठी राहील आणि त्यानंतर आपोआप नाहीसं होईल. तुम्ही टाकलेला स्टेटस फक्त त्यांनाच दिसेल जे तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहेत. इथे हे व्हाट्सअॅप स्टेटस तीन भागांत विभागलं जाईल. पहिल्या भागात तुम्ही स्वतःचं स्टेटस पाहू शकता. दुसर्‍या भागात तुमच्या मित्रांचे तुम्ही न पाहिलेले स्टेटस दिसतील. आणि तिसर्‍या भागात सगळे पाहिलेले स्टेटस असतील. पण लक्षात असू द्या, हे सगळे स्टेटस फक्त २४ तासांच्या आतलेच असतील.

व्हाट्सअॅप स्टेटसची एक झलक

(स्त्रोत

          खरंतर ही सुविधा स्नॅपचॅटने तीन वर्षांपूर्वीच स्नॅपचॅट स्टोरीज या नावाने सुरू केली आहे. त्यानंतर ती हाईक आणि इन्स्टाग्रामवर सुध्दा उपलब्ध झाली. मग यात व्हाट्सअॅप कसं मागे पडेल!!

सबस्क्राईब करा

* indicates required