RBIने बँक लॉकरसाठी आणलेत नवे नियम. ग्राहकांच्या उपयोगाचे हे नियम जाणून घ्या..

बँक लॉकर ही सुविधा बँकांकडून ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाते. आपल्याकडील सोने, चांदीसारख्या मौल्यवान वस्तू एक विशिष्ट भाडे देऊन बँक लॉकरमध्ये ठेवता येतात. अर्थात लॉकर बरेचदा सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी बँका त्यांच्याकडे मोठ्या रकमांच्या ठेवी ठेवायलाही भाग पाडतात. मात्र बँक लॉकर बाबतीत लोकांच्या अधूनमधून अनेक तक्रारी येत असत. याच तक्रारींचा विचार करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक लॉकर संबंधी नवे नियम तयार केले असून हे नियम सर्वांसाठीच महत्वाचे आहेत.

रिझर्व्ह बँकेचे याविषयी आलेले पत्रक वाचले तर अनेक गोष्टी स्पष्ट होतात. बँक लॉकरविषयी पारदर्शकता यावी आणि लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी हे सर्व नवे नियम महत्वाचे आहेत. 

. लॉकरमध्ये वस्तू ठेवल्यानंतर त्या वस्तू चोरीला गेल्यास त्याची पूर्ण जबाबदारी ही बँकेची असेल, ग्राहकांची नाही. अशा परिस्थितीत नुकसान भरपाई देणे हे बँकेसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. अनेकदा असे होते की बँक लॉकरमध्ये चोरी झाल्यास बँक हात वर करते. पण यापुढे बँकेला असे करता येणार नाही. 

. तसेच बँकेने किती लॉकर भरले आहेत आणि किती लॉकर्स रिकामे आहेत याची देखील माहिती ग्राहकांना देणे गरजेचे असेल असा नियम केला आहे. 

. लॉकरसाठी असलेला वेटिंग लिस्ट क्रमांक देखील दाखवणे बँकेसाठी अनिवार्य केले आहे. 

. नव्या नियमानुसार तुम्ही जास्तीतजास्त ३ वर्षांसाठी बँक लॉकर भाड्याने घेऊ शकता. 

. तसेच लॉकरसंबंधी व्यवहार बँकेसोबत झाल्यावर तुम्हाला सर्व अलर्टस् एसएमएस आणि ई-मेलद्वारे कळू शकतील. 

. बँक लॉकरसाठी असलेले भाडे आणि मेंटेनन्स चार्जेस सोडले तर कुठलेही अतिरिक्त पैसे बँक तुमच्याकडून यापुढे आकारू शकणार नाही. 

. याच यादीतील सर्वात महत्वाचा नियम म्हणजे लॉकर रूममध्ये कोण येतो कोण जातो, याची पूर्ण माहिती सीसीटीव्हीमध्ये कैद झाली पाहिजे. तसेच या सीसीटीव्हीचे १८० दिवसांचे फुटेज चोरी वगैरेच्या घटनेत पोलीस मागतील तेव्हा उपलब्ध करून देणे बँकेला बंधनकारक करण्यात आले आहे.

ग्राहकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी हे नियम बदलण्यात आले आहेत. बँक लॉकरविषयी हे सर्व नियम वाचले तर बँकेत आपल्या मौल्यवान वस्तू ठेवणे हे पूर्णपणे सुरक्षित झाले आहे याचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे इतर असुरक्षित ठिकाणी वस्तू ठेवण्यापेक्षा बँक लॉकरमध्ये या वस्तू ठेवणे सोयीस्कर होणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required