“माझ्या नवऱ्याची बायको” बघून कंटाळा आला असेल तर ही शॉर्ट फिल्म बघा !!

Subscribe to Bobhata

सध्या लोक टीव्ही सिरीयलच्या ड्राम्यातून बाहेर येऊ लागली आहेत. त्यांच्यासाठी एक नवा पर्याय आहे वेब सिरीज आणि शॉर्ट फिल्म्सचा. आज आपण अशाच एका मस्त शॉर्ट फिल्मबद्दल बोलणार आहोत. ही शॉर्ट फिल्म आहे विवाहबाह्य संबंधांवर.

नाव आहे ‘छुरी’. टिस्का चोप्रा, सुरवीन चावला आणि सरप्राईज म्हणजे अनुराग कश्यप यात अभिनय करताना दिसत आहे. विषय साधाच आहे. एक माणसाचं बाहेर एका दुसऱ्या स्त्रीबरोबर लफडं असतं. हे चक्कर बायकोला समजतं पण खरी गम्मत तर पुढे आहे.

मंडळी, नवऱ्याला असं रंगेहाथ पकडल्यानंतर सहसा जो ड्रामा होतो, तो इथे नाही.  उलट तिने कशा प्रकारे परिस्थिती हाताळली हे बघण्यासारखं आहे. विशेष म्हणजे याचा टिपिकल “माझ्या नवऱ्याची बायको” होत नाही.

मंडळी आता तुम्हीच बघा ही शॉर्ट फिल्म. दिवस मस्त जाईल !!

सबस्क्राईब करा

* indicates required