व्हिडीओ ऑफ दि डे : पाकिस्तानी पत्रकाराने चक्क गाढवावर बसून केली रिपोर्टिंग.....वाचा पुढे काय झालं !!

मंडळी, पाकिस्तानात कॉमेडी पत्रकार तयार होत आहेत. चांदनवाब आठवतायत ना ? त्यांची पत्रकारिता एवढी प्रसिद्ध झाली, की त्यांच्यावरून बजरंगी भाईजान मध्ये एक पात्र तयार झालं. हे जुनं उदाहरण झालं राव. आज नवीन उदाहरण घ्या. सध्या आणखी एक पाकिस्तानी पत्रकार प्रसिद्धी मार्गावर आहेत. पाहा तर त्यांनी काय केलंय ते.

मंडळी, ही भानगड आहे गाढवांची. पाकिस्तानाच्या लाहोर मध्ये म्हणे गाढव वाढलेत. हसू नका राव, आम्ही इम्रान खान बद्दल बोलत नाहीये. खरोखरचे ‘चार पायांचे’ गाढव वाढलेत. एवढे की गाढवांसाठी गाढवांचे हॉस्पिटल तयार झाले आहेत. लाहोरच्या गाढवांची संख्या सध्या गंभीर विषय बनली आहे.

तर, लाहोर मधल्या गाढवांच्या वाढत्या संख्येचं रिपोर्टिंग करताना आमीन हाफिज हे पत्रकार चक्क गाढवावरच जाऊन बसलेत. गाढवावर बसूनच त्यांनी सांगितलं की गाढवांचे मालक गाढवांच्या वाढत्या किमतीने कसे खुश आहेत. पण ते कदाचित विसरले होते की ते बसलेत तो प्राणी आहे तर शेवटी एक गाढवच. आमीन हाफिज आपलं बोलणं पूर्ण करणार एवढ्यात गाढवाने त्यांना खाली पाडलं.

स्रोत

राव, कॅमेरामन जाम हुशार होता. त्याने आमीन हाफिजला खाली पडताना दाखवलंच नाही. ऐन टायमावर कॅमेरा बंद केला. पण असो....

मंडळी, आपल्याकडे पण असले पत्रकार कमी नाहीत. श्रीदेवी गेल्यानंतर एका पत्रकाराने टब मध्ये उतरून त्यांचा मृत्यू कसा झाला असावा हे समजावून सांगितलं होतं. नुकतंच एका मराठी न्यूज रिपोर्टरने चक्क नवरीच्या वेशात दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची बातमी दिली होती.

स्रोत

राव, याला नवीन दर्जाची पत्रकारिता म्हणायचं का ? काही का असेना, सोशल मिडीयाचं यामुळे मनोरंजन होतं ना....मग आणखी काय हवं !!

सबस्क्राईब करा

* indicates required