युकेच्या या बाईला चक्क ब्लॅंकेटसोबत लग्न का करायचे आहे ??

मंडळी, गेल्या वर्षी एका महिलेने स्वतःशीच लग्न करून लोकांना धक्का दिला होता. आज असाच एक किस्सा घडला आहे. UK च्या एका महिलेने चक्क आपल्या ब्लँकेटशी लग्न करायचं ठरवलं आहे. तिचा आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा हा फोटो पाहा.
मंडळी, याला म्हणतात Objectum-Sexuality. या अवस्थेत माणसाला वस्तूंशी लैंगिक आकर्षण निर्माण होतं. पास्कल सेलिक नावाची ही महिला कदाचित याच रोगाशी निगडीत असावी.
पुढच्या वर्षी तिने आपल्या ब्लँकेटशी सगळ्या लोकांसमोर लग्न करण्याचं ठरवलं आहे. लग्नासाठी तिने नवरीचे पारंपारिक कपडे निवडलेले नसून ती चक्क रात्रीचे झोपतानाचे कपडे घालणार आहे. जसे की गाऊन.
ती म्हणते की आम्ही (तिचा ब्लँकेट आणि ती) फार वर्षापासून एकत्र आहोत. मला तो (ब्लँकेट) सर्वात चांगला जोडीदार वाटतो. तिला हा सोहळा अगदी ‘नॉर्मल’ लग्नासारखा धुमधडाक्यात करायचा आहे. तिने मित्रांनाही आमंत्रण पाठवलं आहे. एवढंच काय तिने पार्टीचा बेतही आखला आहे.
मंडळी, तुम्हाला जर हा प्रकार भयंकर वाटत असला तर थोडं या आजाराच्या इतिहासाकडे नजर टाका. २०१६ साली लॉस अन्जेलिसच्या एका फिल्ममेकरने आपल्या फोनशी लग्न केलं होतं, एका माणसाने तर कार्टून कॅरेक्टरशी पण विवाह केला होता. हे तर काहीच नाही, एका मुलीने तर बर्लिनच्या भिंतीशी लग्न केलं होतं. या मुलीची गोष्ट आम्ही लवकरच सविस्तर सांगणार आहोत.
....पण तूर्तास या प्रकरणाबद्दल तुमचं मत द्या भाऊ !!!