computer

पेटीएम पेमेंट बँक: अफवा किती आणि सत्य काय?

रोज उठून पेटीएमबद्दल एक नवी बातमी येते. त्यात खरं कमी आणि खोटंच जास्त असतं. त्यामुळं विनाकारण ग्राहकांचा गोंधळ उडताना दिसतोय. म्हणूनच आज आम्ही तुमच्या मदतीला धावून आलो आहोत.

वाचा तर मग, पेटीएमबद्द्लच्या अफवा- किती खर्‍या आणि किती खोट्या ते..

​​​​​​​बातमी: पेटीएम बंद होणार आणि त्याचं रूपांतर बँकेत होणार..

सत्य: पेटीएम वॉलेट आधी वन97 हि कंपनी चालवत असे.  RBIच्या मान्यतेनुसार, पेटीएम बँक स्थापन होत आहे. या बँकेत श्री विजय शेखर शर्मा यांचा वाटा ५१% तर वन97 या कंपनीचा वाटा ४९% असेल. आता पेटीएम वॉलेट आधीच्या कंपनीऐवजी नव्या स्थापन होणाऱ्या  Paytm Payments Bank कडून चालवले जाईल. (जसं एसबीआय बडी हे वॉलेट एसबीआय बँक चालवते).

अफवा: 15 जानेवारीपर्यंत पेटीएममधून पैसे काढा नाहीतर ते अडकतील..

सत्य: 15 तारखेपासून केवळ वॉलेटची मालकी बदलते आहे. त्यात असलेले आपले पैसे तसेच असणार आहेत. १५ तारखेनंतरही आतासारखेच आणि तेच ऍप वापरून हे पैसे आपल्याला वापरता येणार आहेत असं पेटीएमनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

अफवा: १५ तारखेनंतर तुमचं पेटीएम बँकेत आपोआप खातं उघडणार..

सत्य: पेटीएमकडून आलेल्या निवेदनानुसार अशी कोणतीही सक्ती ग्राहकांवर नाही. त्यांना बँकेत खातं उघडण्याचा पर्याय मात्र दिला जाईल. त्या खात्यातल्या पैशावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजही मिळेल. मात्र तुमचं त्या बँकेत खातं नसलं तरीही तुम्हाला पेटीएम वापरता येणार आहे.

अफवा: पेटीएम बँकेत खातं असल्याशिवाय पेटीएम वॉलेटमधील तुमचे पैसे तुम्हाला काढता येणार नाहीत..

सत्य: पेटीएमकडून आलेल्या निवेदनानुसार तुम्हाला पेटीएम वॉलेटची सेवा बंद करायची असल्यास एका विशिष्ट इमेलवर तुमच्या बँकेचे तपशील दिल्यास त्या खात्यात रक्कम जमा करता येईल, आणि त्यावर कोणतीही ट्रान्सफर फी लागणार नाही.

पेटीएमचं तपशीलवार निवेदन तुम्ही या ठिकाणी वाचू शकता:

https://blog.paytm.com/your-paytm-wallet-paytm-payments-bank-various-charges-a1d28361dcb0

सबस्क्राईब करा

* indicates required