f
computer

वायरल व्हिडिओ : सुरक्षा दलाचा जवान सांगतोय जवानांची हृदयद्रावक दुर्दशा

देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून उभ्या असणाऱ्या जवानांचे आपल्या देशावर कितीतरी मोठे उपकार असतात. पण या जवानांना तिथल्या वातावरणात कोणकोणत्या प्रतिकूल परिस्थितीतून जावं लागतं याचा मात्र आपण कधीच विचार करत नाही.     या व्हिडिओमध्ये दिसणार्‍या जवानाने जणू आपली नोकरी पणाला लावून आपली सारी कैफियत देशासमोर मांडली आहे. या जवानाचं नाव आहे तेज बहादूर यादव. अतिशय थंड अशा बर्फाळ भागात ११-११ तास उभ्याने पहारा देणार्‍या या जवानांना नाष्टा म्हणून फक्त पराठे आणि चहा दिला जातो.  यांचं जेवणही अतिशय नित्कृष्ट दर्जाचं आहे. सरकारकडून सगळं काही मिळतं, पण वरचे अधिकारी सगळं विकून टाकतात, असं हा जवान या व्हिडिओ मध्ये सांगताना दिसतोय.

जवान मांडत आहे आपली कैफियत..

जिथं जवानांना चौरस आणि पौष्टिक आहार मिळायला हवा, तिथे त्यांना विना फोडणीचं बेचव वरण आणि साध्या रोट्या तोड्याव्या लागत आहेत. जिथं शहीदांच्या शवपेट्यांतही भ्रष्टाचार होतो, तिथं जवानांच्या अन्नातही झाला म्हणून आश्चर्य वाटायला नको. 

जवानांना असं निकृष्ट जेवण दिलं जात आहे

मात्र बीएसएफकडून या जवानालाच मनोरुग्ण ठरवण्यात आलं आहे. हा व्हिडिओ आल्यानंतर बीएसएफने या जवानाला दारूचं व्यसन असल्याचं आणि तो आज्ञापालन करत नसल्यानं त्याच्यावर कारवाई होणार होती असं सांगितलं आहे.