दुर्मिळ अशा 'ब्लॅक पॅन्थर'चे हे मनमोहक फोटो... पहायला तर हवेतच...

काळ्या बिबट्याचं दर्शन तसं दुर्मिळच. पण कर्नाटकातील‌ जंगलांमध्ये असे ६ काळे बिबटे आहेत. सध्या सोशल मीडियावर यातल्याच एका काळ्या बिबट्याची छायाचित्रं वेगानं वायरल होत आहेत. कर्नाटकातील नागरहोळे नॅशनल पार्कचा भाग असणाऱ्या काबीनी जंगलात ही सुंदर छायाचित्रं टिपली गेली आहेत. 'साया' असं‌ या बिबट्याचं नाव आहे.

जंगल बुकमधल्या सर्वांच्या लाडक्या बघीराची आठवण करून देणारे हे फोटो Earth नावाच्या एका प्रसिद्ध ट्रॅव्हल‌ आणि वाइल्डलाइफ फोटो शेअरींग अकाऊंटवरून शेअर केले गेले आणि आतापर्यंत या फोटोंना २ लाखांहून अधिक लाईक्स, आणि ५४ हजारांहून अधिक रिट्विट मिळालेले आहेत. मुळात ही छायाचित्रं 'शाज जंग' नावाच्या एका भारतीय पर्यावरणवादी आणि वाइल्डलाइफ फोटोग्राफरनं २०१९ मध्ये‌ टिपून ती इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shaaz Jung (@shaazjung) on

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shaaz Jung (@shaazjung) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shaaz Jung (@shaazjung) on

जंगलात निवांतपणे फिरणारा आणि झाडामागून‌ डोकावून पाहणारा हा 'ब्लॅक पॅन्थर' इतक्या मनमोहक पध्दतीनं फोटोत कैद करण्यामागे ३१ वर्षीय शाज यांची मेहनत आहे. नॅशनल जिऑग्राफीसोबत काम करताना त्यांनी ३ वर्षं या जंगलात व्यतित केली आहेत. ते 'निकॉन इंडिया'चे ब्रॅंड ॲम्बेसेडरही आहेत. त्यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट अशा अनेक सुंदर फोटोंनी सजलेलं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required