computer

जगात पांढरा जिराफही असतो?? पण तो तुम्हांला कदाचित कधीच का पाहायला मिळणार नाही?

जगभरातून प्राण्यांच्या प्रजाती लुप्त होत आहेत. या पाठीमागे नैसर्गिक कारणं जितकी आहेत, तितकीच मानवनिर्मित कारणे जबाबदार आहेत. भारतीय चित्ता, गुलाबी डोक्याचे बदक, माळढोक पक्षी या आपल्या भारतातून नष्ट झालेल्या काही प्राण्यांच्या प्रजाती आहेत. नुकतंच केनियामध्ये असाच एक दुर्मिळ प्राणी कायमचा संपवण्यात आला आहे. हा प्राणी म्हणजे पांढरा जिराफ.

पांढरा जिराफ असतो हे जगाला २०१७ साली समजलं. केनियाच्या पूर्वेकडील इशाकबिनी हिरोला अभयारण्यात पांढऱ्या रंगातील मादी जिराफ आढळली होती. तेव्हापासून अभयारण्य अधिकाऱ्यांकडून तिचा सांभाळ केला जात होता. तिने दोन पिल्लांना जन्मदेखील दिला. त्यातल्या एका पिल्लासोबत असताना शिकाऱ्यांनी तिचा जीव घेतला आहे. शिकाऱ्यांनी पिल्लाचा जीव घेतला नाही, पण आईच्या मृत्यूमुळे पिल्लाचा उपासमारीने जीव गेला. मृतदेहावरून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की ही घटना तीन ते चार महिन्यांपूर्वी घडली असावी.

सुदैवाने या मादा जिराफचं एक पिल्लू जिवंत आहे, पण तो नर असल्याने पांढऱ्या जिराफची संख्या वाढण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे. संशोधनातून असं आढळून आलं आहे की पांढऱ्या जिराफना मिळणारा पांढरा रंग हा ऐल्बिनिजम आजाराचा परिणाम नाही, तर ल्युसिझीमचा परिणाम आहे. ल्युसिझीम प्रकारात प्राण्यांना पांढरा रंग मिळतो किंवा अंगावर चट्टे उमटतात.

आता प्रश्न पडतो की या प्राण्यांना मारून शिकाऱ्यांना काय मिळालं. उत्तर कदाचित कधीच मिळणार नाही.

अशाच नष्ट झालेल्या प्राणी प्रजातींवरचा आमचा हा लेख वाचायला विसरू नका.

लुप्त झालेले १० अनोखे प्राणी !!

सबस्क्राईब करा

* indicates required