computer

हेरा फेरीचा तिसरा भाग येतोय....काय काय आहे या नवीन हेर फेरीत ?

सध्या मिम्सचा जमाना आहे. मिम्स हेच एक प्रकारची भाषा झाले आहेत. एखाद्या सिनेमातील किंवा इतर ठिकाणातील अचूक गोष्ट दुसऱ्या ठिकाणी बसवली मी झाला मीम तयार. त्यातून उपहासात्मक पध्दतीने व्यक्त होता येते. या मिम्सच्या बाबतीत हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी हे दोन सिनेमे म्हणजे चालते बोलते मिम्स आहेत. सर्वाधिक मिम्स टेम्प्लेट याच दोन सिनेमात सापडतात. 

हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी हे दोन्ही सिनेमे एवढे वर्ष उलटून देखील म्हणूनच प्रचंड लोकप्रिय आहेत. याच कारणाने 'हेरा फेरी ३' केव्हा येईल याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेली पाहायला मिळते.

तर, सर्व हेरा फेरी फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच 'हेरा फेरी ३' तुमच्या भेटीस येऊ शकतो. प्रोड्युसर  फिरोज नाडीयादवाला यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. त्यातही आनंदाची गोष्ट म्हणजे सर्वांचे आवडते राजू, शाम आणि बाबूभाई म्हणजेच अक्षय कुमार, सुनिल शेट्टी आणि परेश रावल हेच परत या तिघांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

लवकरच हेरा फेरी ३ ची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. फिरोज नाडीयादवालाच्या म्हणण्यानुसार फिर हेरा फेरी नंतर एवढ्या वर्षांचं पडलेलं अंतर   भरून काढण्यासाठी हेरा फेरीचे पुढे आणखी अनेक भाग बनविण्यात येणार आहेत. पुढे त्यांनी सांगितले की, जिथे फिर हेरा फेरी संपली होती, म्हणजे राजू पाण्यात बंदूका बुडविण्याचा प्रयत्न करतो, बरोबर तिथून तिसरा भाग सुरू होणार आहे. दुसऱ्या भागात पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तिसऱ्या भागात मिळू शकतील.

तर, हेरा फेरी फॅन्सनी आता जल्लोष करायला हरकत नाही. मागील दोन्ही भागातील तुमचे आवडते प्रसंग कमेन्ट करा पटापट.

सबस्क्राईब करा

* indicates required