रामदेव बाबांची इथेही एंट्री...आता आलं पतंजलीचं पौष्टिक हॉटेल !!!

रामदेव बाबांना जेवढी आपली चिंता आहे तेवढी कुण्णाकुण्णालाच नाही. पतंजली टूथपेस्ट, पतंजली नूडल्स, पतंजली ब्यूटी प्रोडक्ट, पतंजली मीठ, पतंजली हे-पतंजली ते.... सगळं पतंजली. 
आता हे कमी होतं की काय म्हणून पतंजली आता हॉटेल व्यवसायातही उडी घेणार आहे.

चंडीगडच्या झिराकपूरमध्ये पाहिलं पतंजलीचं पौष्टिक हॉटेल सुरु झालंय. अर्थात पतंजलीचं हॉटेल आहे म्हटल्यावर इथं सर्व प्रोडक्ट्स पतंजलीचेच वापरले जातात.

स्रोत

इथे हर-तर्हेच जेवण तर आहेच पण उन्हाळ्यासाठी खास कैरीचं पन्हंसुद्धा आहे. घरच्या जेवणाला मिस करत असाल तर तुमच्यासाठी ‘घर का खाना’ नावाची स्पेशल डिश इथे मिळेल. आणि खास बात म्हणजे हे सर्व तुमच्या खिश्याला परवडेल असचं आहे मित्रांनो...

सध्या हे पौष्टिक हॉटेल फक्त चंदिगडमध्ये असलं तरी तिथल्या कामावर हॉटेलचं पुढचं भविष्य ठरणार आहे...

तर मग काय जाणार का, पौष्टिक जेवण जेवायला ?

सबस्क्राईब करा

* indicates required