बघा चायनीज इंजिनिअरींगची कमाल : १९ मजली इमारतीतून जाते रेल्वे!

चीनमधल्या लोकांची डोकी बरीच सुपीक आणि कल्पक असतात भाऊ. जगाला सतत काहीनाकाही अजबगजब दाखवून देणं हेच बहुतेक चायनीज माणसाचं कर्तव्य असावं. आता हेच बघा ना... या लोकांनी चक्क १९ मजली इमारतीतून रेल्वे घुसवलीये.

दक्षिण चीनेमधलं चोंगक्विंग हे एक बेसुमार घनता असलेलं शहर आहे. या अवघ्या ८२,००० वर्ग किलोमीटरच्या शहरात जवळपास ५ करोड लोकं राहतात. त्यामुळं इथं रस्ते आणि रेल्वे प्रोजेक्टसाठी जागा मिळणं कठीणच. म्हणूनच इथल्या सीटी प्लॅनर्सनी डायरेक्ट १९ मजली इमारतीतून रेल्वे ट्रॅक पास केला आहे. विशेष म्हणजे या इमारतीत ही रेल्वे थांबण्यासाठी स्टेशनही आहे.

आपल्याकडे कसं... काही सरकारी काम निघालं की वाटेत येणारं सगळं काही फोडून पुढची वाटचाल केली जाते. पण चिन्यांनी हे भारी केलंय. आणि इमारतीत राहणाऱ्या लोकांना मोठ्या आवाजाचा त्रासही होत नाही. कारण तशी आवाज कमी करणारी उपकरणही इथं बसवलेली आहेत. अशी इंजिनिअर लोकं आपल्याला कधी भेटणार देव जाणो.

सबस्क्राईब करा

* indicates required