आयकीयाची किमया : बांधा घर चार तासात, एक लाखात!!!

Subscribe to Bobhata

मुंबई पुण्यात आम जानतेची घरासाठी होणारी परवड सगळ्यांनाच माहितीये. आपलं हक्काचं घर मिळवण्यासाठी लोकांचा जन्म जातो! तुम्ही या समस्येवर आधारित अमोल पालेकरचा ‘घरोंदा’ किंवा मराठी चित्रपट ‘मुंबईचा जावई, ‘डबल सीट’ चित्रपट पाहिले असतीलच. पण ज्यांचं घर आहे असे लोकही पुरामुळे, भूकंपामुळे, त्सुनामीमुळे किंवा युद्धामुळे एका रात्रीत रस्त्यावर येतात. काही वर्षापूर्वीच डोंगर कडा कोसळून माळीण गाव एका रात्रीत उध्वस्त झालं होत हे तुम्हांला आठवतच असेल !

‘आयकिया’ (Ikea) नावाच्या एका फर्निचर बनवणाऱ्या कंपनीनं यावर नामी उपाय शोधून काढला आहे. आयकिया या कंपनीचे फर्निचर जगभर प्रसिद्ध आहे. ते त्यांच्या CKD (Complete Knock Down) फॉर्मुल्यावर आधारित असतँ. कंपनी सगळे सुटे भाग विकते. गिर्‍हाइकानं ते सुटे भाग घरी न्यायचे आणि जोडायचे..  की लगेच फर्निचर तयार! या अनुभवावर या कंपनीनं चार तासात २०० चौरस फुट घर उभं करता येईल असं एक डिझाईन तयार केलंय.

या घराचे एकूण ६८ सुटे भाग आहेत. घराच्या भिंती आणि छप्पर प्लास्टिकचे आहे, आणि  सांगाडा स्टील ट्यूबने बनवलाय. इतकंच नव्हे तर घराच्या छपरावर सौर उर्जेची निर्मितीही होते. हे सर्व सुटे भाग जोडून घर उभं करायला फक्त चार तास आणि दोन मिनिटं लागतात. घराची किंमत देखील एक लाखाच्या आत आहे.

तुमच्या मनात कदाचित शंका येईल की असं घर तकलादू असेल.  पण तसं नाही. घराच्या भिंती सहजासहजी तुटण्यासारख्या नाहीत. सिरीयासारख्या अराजक माजलेल्या देशात निर्वासितांसाठी नवीन गावे ही घरे वापरून तयार झाली आहेत. हे सोबतच्या क्लिपमध्ये तुम्ही बघालच.

चला, आता फक्त मोकळी जागा बघा आणि चार तासात बांधून टाका घर!!!

सबस्क्राईब करा

* indicates required