computer

या मायराला दत्तक घेण्यासाठी टाटांनी केलं आवाहन!

मागच्या महिन्यात रतन टाटा इन्स्टाग्रामवर आले. त्यानंतर ते सातत्याने आपल्या अकाऊंटवरून काही ना काही शेयर करत होते. पण सध्या त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमुळे त्यांच्याबद्दलचा लोकांचा आदर अजून दुणावला आहे मंडळी!!

जगभर आपल्या दयाळू स्वभावामुळे ओळख असलेले रतन टाटा आपल्या श्वानप्रेमासाठी सुद्धा ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी कुत्र्यांचे अपघात थांबावेत म्हणून सुरू करण्यात आलेल्या प्रयोगात गुंतवणूक केल्याची माहिती आम्ही तुम्हाला बोभाटाच्या माध्यमातून दिली होतीच. सध्या त्यांची अशीच एक इन्स्टाग्राम पोस्ट वायरल होत आहे. ज्यात त्यांनी ९ महिन्याच्यां कुत्र्याच्या पिल्लाला कुणीतरी दत्तक घ्यावे म्हणून आवाहन केले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ratan Tata (@ratantata) on

या लहान कुत्रीचे नाव आहे मायरा! त्यासाठी त्यांनी एक मोठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये मायराला कशाप्रकारे दत्तक घेता येईल याची लिंकसुद्धा शेयर केली आहे. मायरा सध्या कुत्र्यांची देखभाल करणाऱ्या एका संस्थेत राहत आहे. रतन टाटांनी त्यांच्या पोस्टमध्ये कुत्र्यांची देखभाल करणाऱ्या संस्था तसेच लोकांचेसुद्धा आभार मानले आहेत. 

रतन टाटा यांच्याकडे सध्या दोन कुत्रे आहेत. त्यांचे श्वानप्रेम जगजाहीर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा कुत्रा टिटो वारला जेव्हा त्याच्या १४व्या वाढदिवसादिवशी त्यांनी टिटोबद्दल भावनिक पोस्ट लिहिली होती. 

मग? अगदी या मायराला नाही, पण कधीतरी घरी एखादं कुत्र्याचं गोजिरवाणं पिल्लू पाळावं असं तुम्हांला वाटलंय की नाही? पण मग खरोखर पिल्लू घरी आलं की चिंटू आणि कुत्र्याच्या पिल्लाच्या गोष्टीसारखं झालं?

 

लेखक : वैभव पाटील

 

आणखी वाचा :

या २७ वर्षांच्या तरुणाला स्वतः रतन टाटांनी देऊ केली आहे नोकरी...त्याने अशी कोणती कामगिरी केली आहे ??

सबस्क्राईब करा

* indicates required