ऐन दिवाळीच्या तोंडावर जिओ युझर्ससाठी दुःखद बातमी !!

रिलायंस जिओने दिवाळीच्या तोंडावर धक्का दिला आहे. आजवर जिओने अनेक सुखद धक्के दिले पण यावेळचा धक्का दुःखद ठरणार आहे. ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कवर आउटगोइंग कॉल करण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. त्यासाठी 6 पैसे प्रति मिनिट असा दर ठरविण्यात आला आहे. यासाठी जिओच्या ग्राहकांना इंटरकनेक्टेड युसेज चार्ज टॉप अप करावा लागणार आहे. जिओचे म्हणणे आहे की त्यांचे ग्राहक जेवढ्या किमतीचा टॉप अप करतील तेवढ्या किमतीचा फ्री डेटा त्यांना देण्यात येईल. यासोबत जिओचे फ्री इनकमिंग कॉल्स आणि इतर सुविधा जशाच्या तश्या सुरू राहतील.
कॉल टर्मिनेशन चार्ज संपविण्यासाठी ट्राय कडून पुरेसे पाऊल उचलण्यात न आल्याने जिओने ग्राहकांकडून आउटगोइंग कॉलसाठी 6 पैसे प्रति मिनिट एवढ्या दराने पैसे वसूल करायचे ठरवले आहे.
जिओकडून उपलब्ध करून देण्यात आलेले टॉप अप्स पुढीलप्रमाणे आहेत.
10 रुपये - या प्लॅन नुसार ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 124 मिनिट फ्री व्हॉइस कॉल आणि 1 जीबी डेटा मिळेल.
20 रुपये - या प्लॅन नुसार ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 249 मिनिट मिळतील आणि 2 जीबी डेटा मिळेल.
50 रुपये - या प्लॅननुसार ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 656 मिनिट मिळतील आणि 2 जीबी डेटा फ्री मिळेल.
100 रुपये- या प्लॅन नुसार ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 1362 मिनिट आणि 10 जीबी फ्री डेटा मिळेल.
जिओचे म्हणने आहे की त्यांनी गेल्या 3 वर्षात दुसऱ्या नेटवर्कना 13, 500 रुपये ICU च्या रूपात दिले आहेत. कंपनी कडून असेही सांगण्यात आले की सगळे काही व्यवस्थित झाले तर 1 जानेवारी नंतर ग्राहकांना आउटगोइंग कॉलसाठी सुद्धा पैसे मोजावे लागणार नाहीत.