computer

गुन्हेगारांना फाशी देणारा जल्लाद पवन कुमार- जाणून घ्या त्यांचा पिढीजात व्यवसाय आणि यासाठीचा मोबदला!

२२ जानेवारी २०२० रोजी निर्भया बलात्कार प्रकरणातील ४ आरोपींना फासावर लटकावण्यात आले  तेव्हा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बातमी आली होती की तिहार जेलकडे या कामासाठी ‘जल्लाद’च नाही, पण आता तिहार जेलतर्फे एक तज्ञ जल्लादला पाचारण करण्यात आलंय. कोण आहे हा जल्लाद ? तो महत्त्वाचा का आहे? चला जाणून घेऊ या.

या जल्लादचं नाव आहे ‘पवन कुमार’. फाशी देणं हा पवन कुमार यांचा पिढीजात व्यवसाय आहे. असा पिढ्यानपिढ्या व्यवसाय असतो का ? तर असतो. खरं तर जल्लाद निवडण्यासाठी पहिली पसंती ही जल्लादचं काम पिढीजात करत असलेल्या व्यक्तीलाच दिलं जातं.

पवन कुमार यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या कुटुंबाचा १९५१ पासूनचा हा व्यवसाय आहे. त्यांच्या आजोबांनी १९८७ साली इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांना फाशी दिली होती. त्यावेळी पवन कुमार हे २२ वर्षांचे होते. आपल्या आजोबांना जल्लादचं काम करताना त्यांनी पाहिलं होतं. एवढंच नाही आजोबा आणि वडिलांना या प्रक्रियेत त्यांनी मदत केली होती.

तिहार जेलला पवन कुमार महत्त्वाचे वाटतात ते याच कारणासाठी. त्यांच्या कुटुंबाचा हा व्यवसाय असल्यामुळे त्यांच्याकडून काही चूक होण्याची शक्यता कमी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवन कुमार यांचे डोळे व्यवस्थित आहेत आणि त्यांचं आरोग्यही उत्तम आहे. जल्लादचं काम करणाऱ्या व्यक्तीसाठी गरजेच्या असलेल्या सर्व कसोटीवर ते उतरतात.

पवन कुमार हे फाशीची शिक्षा देण्यासाठी अनेक दिवसांपासून वाट बघत होते. याचं एक मुख्य कारण हे आर्थिक आहे. पवन कुमार यांना या कामासाठी १ लाख रुपये मिळणार आहेत. हे पैसे ते आपल्या मुलीच्या लग्नासाठी खर्च करणार आहेत.

जल्लादचं काम महत्त्वाचं असलं तरी या कामात फारच कमी पैसा मिळतो. अजमल कसाबला फाशी देणाऱ्या बबू जल्लाद यांना २०१२ साली ५००० रुपये देण्यात आले होते. बरेचदा फाशीची शिक्षा पुढेही ढकलली जाते.

शेवटची शिक्षा म्हणून फाशी देणारा भारत हा मोजक्या देशांमध्ये मोडतो. जवळजवळ ५५ देशांमध्ये आजही देहांताची शिक्षा दिली जाते. भारतात २००१ पासून जवळजवळ २७० लोकांना फाशीची शक्षा फर्मावण्यात आली आहे, पण त्यांना फाशी देण्यात आलेली नाही. २००७ साली संयुक्त राष्ट्राने मांडलेल्या देहान्ताच्या शिक्षेला विरोध करणारा ठराव मांडला होता. भारताने या ठरावाच्या विरोधात मत दिलं होतं.

तुम्हाला काय वाटतं ? फाशीची शिक्षा बरोबर की चूक ?

 

आणखी वाचा :

प्राणघातक इंजेक्शन : अमेरिकेत मृत्युदंड असा दिला जातो...यापुढे तर फाशीची शिक्षा सुद्धा फिकी पडेल !!

सबस्क्राईब करा

* indicates required