या रशियन माणसाने आपली कार तब्बल १००० फुटावरून खाली का फेकली ?
गाडी जर सतत बिघडत असेल तर लोक ती विकून टाकतात, पण रशियाच्या एका माणसाने आपली कार १००० फुटावरून खाली फेकली आहे.
मंडळी, ईगोर मोरोझ हा रशियन व्लॉगर आहे. त्याने २०१८ साली मर्सिडीजची AMG G63 ही एसयूव्ही कार घेतली होती. यासाठी त्याने १,९२,३५,४७५ रुपये (२७०,००० डॉलर्स) मोजले होते. कार घेतल्यापासून त्याला अनेक तांत्रिक अडचणी आल्या. कार रोडवर कमी पण गॅरेजमध्येच जास्त राहायची. कार डीलर्सनी कार दुरुस्त करण्यास नकारही दिला होता.
या सगळ्यांचा राग काढण्यासाठी त्याने कार फेकण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये हा प्रकार होणार होता, पण मॉस्कोच्या प्रदेशात भरपूर प्रमाणात अस्वल आणि इतर प्राणी असल्याने हे धोकादायक होतं. म्हणून मग रशियाच्या पश्चिमेला असलेल्या करेलीया ठिकाण निवडण्यात आलं. तिथल्या हेलिकॉप्टर टीमने मिळून ईगोरला मदत केली. निर्जन बर्फाळ प्रदेशात १००० फूट उंचीवर नेऊन कार फेकण्यात आली.
ईगोर व्लॉगर असल्याने या क्षणाचा त्याने व्हिडीओ तयार करून युट्युबवर अपलोड केला आहे. हा ७ मिनिटांचा व्हिडीओ जवळजवळ १२ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. जास्त वेळ न दवडता तुम्ही पण हा व्हिडीओ पाहून घ्या !!
एका रिपोर्टनुसार गाडीत कसलाही बिघाड नव्हता. इगोर मोरोझ आणि त्याच्या मित्रामध्ये गाडीला उंचावरून फेकण्याचा करार झाला होता. हे समजताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे. कदाचित इगोरवर खटला भरला जाऊ शकतो.
मंडळी, लोकांनी आपल्या गाड्या जाळल्याच्या किंवा फेकल्याच्या अशा घटना नवीन नाहीत. ही पाहा आपल्या भारतातली २ उदाहरणं...
व्हिडीओ ऑफ दि डे : या व्हिडीओला बघून प्रत्येकजण हळहळ का व्यक्त करतोय ? पाहा हा धक्कादायक व्हिडीओ !!




