सलौलीम धरण : हे धरण आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही...पाहा बरं कुठे आहे हे धरण !!

मंडळी, आजवर तुम्ही बरीच धरणं पाहिली असतील. काही धरणं तर लांबूनच बघावी लागतात. धरणावर जाऊन तो प्रचंड प्रवाह बघण्याची खूप इच्छा असूनही सुरक्षेच्या कारणास्तव किंवा इतर कारणांमुळे आपल्याला लांबूनच समाधान मानावं लागतं. पण अपवाद नक्कीच असतात. असाच अपवाद गोव्यात आहे राव. गोव्याचं सलौलीम (सलौली) धरण आपल्याला आपली इच्छा पूर्ण करू देतं.

स्रोत

२००० साली खास पर्यटकांसाठी सलौलीम नदीवर 'सलौलीम धरण' बांधण्यात आलं. धरण म्हटलं की आपल्या डोक्यात पहिल्यांदा जे चित्र येतं त्यापेक्षा हे धरण अगदी वेगळं आहे. या धरणाचा आकार हा अर्धगोलाकार असून धरणाच्या अगदी तोंडाशी आपल्याला उभं राहता येतं. त्यासाठी खास कठडा बांधण्यात आला आहे. नदीचं पाणी वाढल्यावर धरणातून धबधब्या सारखं पाणी वाहताना आपण बघू शकतो. यासाठीच सलौलीम धरण बघायचं असेल तर पावसाळ्यातले दिवस अगदी योग्य ठरतात.

स्रोत

या भागात तुम्हाला मस्त पिकनिकचा आनंद लुटता येईल. धरणाजवळच बोटॅनिकल गार्डन आहे. हे गार्डन म्हणजे मैसूरच्या प्रसिद्ध वृंदावन गार्डनची प्रतिकृती आहे. याखेरीज हा भाग इतका समृद्ध आहे की तुम्हाला वेगवेगळे दुर्मिळ पक्षी पाहता येतील. किंगफिशर पक्षी तर या भागात सहज आढळतो.

स्रोत

मंडळी, धरण बघण्यासाठी तुमच्याकडून फक्त २० रुपये फी घेतली जाते. आणि हो धरण दररोज बघता येऊ शकतं. भेट देण्याची वेळ ही सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंतची आहे. पण जाताना आपल्या सोबत पॅन कार्ड किंवा आधारकार्ड घेऊन जायला विसरू नका. त्याशिवाय एन्ट्री मिळणार नाही राव.

सबस्क्राईब करा

* indicates required