computer

तुम्ही घरचं काम करता, तुम्हांला त्याचा किती पगार मिळायला हवा असं तुम्हांला वाटतं?

मुलांना सांभाळणं, घरकाम, स्वयंपाक, आणि घरातल्या इतर लहानसहान कामांचं वेतन घरातल्या स्त्रियांना मिळत नसतं. आपल्या आईचाच दिनक्रम बघा ना. ती दिवसभर घरात राबते, पण तिला महिन्याच्या पहिल्या एक दमडी मिळत नसते. समजा पैसे मिळाले असते तर ? तो आकडा किती असता ? एका नवीन अहवालातून याचं उत्तर शोधण्यात आलं आहे.

Oxfam या संस्थेने सादर केलेल्या अहवालात असं म्हटलंय, की जगभरातल्या स्त्रिया जे काम विनावेतन करतात त्याचं जर वेतन ठरवायचं झालं तर तो आकडा ७ लाख कोटी इतका होतो. सोप्प्या शब्दात, अॅपल कंपनीच्या एकूण वार्षिक उत्पन्नापेक्षा तब्बल ४३ टक्के जास्त रक्कम !!

भारतापुरतं सांगायचं झालं, तर हा आकडा भारताच्या GDP च्या ३.१ टक्के एवढा मोठा आहे. या विनावेतानाची वेळही मोजण्यात आली आहे. शहरी आणि ग्रामीण भागात स्त्रिया दिवसाचा ३१२ ते २९१ मिनिट वेळ कामात घालवतात. या कामाचे त्यांना पैसे मिळत नाहीत. तर या उलट पुरुष २९ ते ३२ मिनिट वेळ कामात घालवतात.

याच अहवालात असंही सांगण्यात आलंय की भारतात पुरुषांच्या आणि महिलांच्या वेतनात मोठी तफावत आढळून येते. ही तफावत ३४ टक्के एवढी मोठी आहे. भारतात जास्तीत जास्त महिला या विनावेतन काम करतात. आणि ज्या कामात वेतन मिळतं तिथला वेतनाचा आकडा कमी असतो. याशिवाय कामाच्या ठिकाणी किंवा घरी अनुभवाला येणारी गैरवर्तणूक हा एक वेगळाच मुद्दा आहे. या अहवालातून आर्थिक असमानाता आपण स्पष्ट पाहू शकतो.

मंडळी, आपल्या देशात जिथे मुलींना घरकाम आलंच पाहिजे हा अलिखित नियम असतो तिथे हा अहवाल नक्कीच विचार करायला लावणारा आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required