पाच सेकंदात नेसून होते ही साडी....कशी वाटली ही आयडिया?

साडी नेसायला साधारण किती वेळ लागतो? याचं उत्तर एकच एक असं देता येत नाही. सिंथेटिक मटेरियलच्या, जॉर्जेट-शिफॉनसारख्या साड्या पटकन नेसून होतात, तर कांजीवरम, पेपरसिल्कच्या साड्यांना मात्र नेसायला जाम वेळ लागतो. त्यात ती साडी एकदा नेसून झाली असेल, तर पुन्हा नेसताना घडीवर घडी यावीच लागते. नाहीतर मग रोजच्या साडी नेसणाऱ्या बायकांनापण साडी नेसताना भलताच त्रास होतो. हे सगळं असं असेल, तर कधीतरी वर्ष-सहा महिन्यांतून एकदा साडी नेसणाऱ्यांना साडी नेसायला किती वेळ लागतो हे विचारुच नका.

जॉर्जेट-शिफॉनसारख्या साड्या नेसायला वेळ लागत नाही म्हटलं, तरी साडी नेसायला पंधरावीस मिनिटं लागतातच. पण तुम्हांला आता पाच सेकंदात साडी नेसून होईल म्हटलं तर ?? विश्वास नाही ना बसला ? मग पाहाच हा व्हिडिओ...

काय, होईल ना पाच सेकंदात साडी नेसून? अगदी " खुले आम आँचल ना लहराके चलिए" असं कुणाला म्हणावंसं वाटेल ना हे पाहून ? 

पण कसं आहे ना, जशी शिवलेल्या नऊवारीत नेसलेल्या नऊवारीचा दिमाख आणि तोरा नाही, तशीच या एका काखेत अडकवायच्या आर्महोल साडीमध्ये आपल्या नेहमीच्या साडीची ऐट नाही. फॅशन म्हणून एखाद्यावेळेस कुणी कौतुकानं ही साडी 'घालेल' सुद्धा, पण पसंती मात्र नेहमीच्या पाचवारी साडीलाच असेल. साडी नेसायला किमान तासभर लावून "आत्ता झालं पाच मिनिटांत", असं म्हटल्याशिवाय साडी नेसल्यासारखंच वाटत नाही ना!! साड्या नेसणाऱ्या ताई-माई-आक्कांनो,  तुम्हांला काय वाटतंय या पाच सेकंदवाल्या अडकवायच्या साडीबद्दल ??

 

आणखी वाचा :

तुमच्या सुंदर रेशमी साड्यांना पुन्हा उपयोगात आणण्याच्या ८ हटके आयडिया..

तुमच्या सुंदर साड्यांना पुन्हा उपयोगात आणायच्या २५ सॉलीड आयडियाज...

सबस्क्राईब करा

* indicates required