राजस्थानच्या वाळवंटात बर्फ पडतोय...हे फोटो आणि व्हिडीओ पाहिले का ?

१३ डिसेंबर २०१९ ला बातमी आली की शिमला, कुर्ग, मनाली भागात वर्षातला पहिला बर्फ पडला आहे. या बातमीत तसं काही फार खास नव्हतं. या तिन्ही भागांमध्ये बर्फ पडतोच, पण काल एके ठिकाणी पडलेल्या बर्फाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हे ठिकाण आहे राजस्थानचं नागौर.
नागौर हे जोधपुर आणि बिकानेरच्या मध्ये वसलेलं आहे. परव तिथे मोठ्याप्रमाणात गारपीट व पाऊस आला. त्यामुळे तिथल्या वाळवंटावर पांढरी चादर पसरली आहे.हा व्हिडीओ पाहा.
राजस्थान सारख्या वाळवंटी भागात गारांचा पाऊस पडण्याची घटना अत्यंत दुर्मिळ आहे. हे दृश्य बघण्यासाठी छान वाटत असलं तरी एक गोष्ट विसरायला नको की हा जागतिक तापमान वाढीचा परिणाम आहे. हवामानाचं चक्र किती मोठ्याप्रमाणात बदललं आहे हेच सिद्ध होतं. हे कोणामुळे झालंय हे वेगळं सांगायला नको.
हे आजच घडतंय असं नाही. अशीच घटना गेल्यावर्षी घडली होती. अत्यंत उष्ण तापमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या जगातल्या सगळ्यात मोठ्या ‘सहारा’ वाळवंटात बर्फ पडला होता. या गोष्टीची चर्चा जगभर झाली होती.
चक्क वाळवंटात बर्फ पडतोय....फोटो बघून घ्या राव !!