काय म्हणता, 'बेंगलूर अय्यंगार' बेकरी ही खरी बेंगलूर अय्यंगार बेकरी नाहीच आहे ??

जर तुम्ही मुंबई पुणे नाशिक नगर या शहरांच्या परिसरात असाल तर एकदा तरी तुम्ही बेंगलूर अय्यंगार बेकरीला भेट दिली असेल. त्या बेकरीत मिळणारा रवा केक हा एकदम फेमस आयटम आहे. पण यापैकी एकही ऑथेंटिक बेंगलूर अय्यंगार बेकरी नाही, असा दावा खुद्द बेंगलूर अय्यंगार बेकरीचे मालक श्रीधर यांचा आहे.

कर्नाटक मधील हासन जिल्ह्याचे अय्यंगार कुटुंब या ब्रांडचे  खरे मालक आहेत. थोडा विचार करा, ज्या नावाने एकट्या मुंबईत चारशे दुकानं धंदा करत आहेत. पण हा ब्रांड अजूनही रजिस्टर्ड नाही  आणि आपले नाव वापरून इतका तोबा तोबा धंदा होतो आहे याची कल्पना पण मूळ मालकाना काही वर्षांपर्यंत नव्हती.

श्रीधर हे बेंगलूर बेकरीचे मालकांच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. आता ते नावाची नोंदणी आणि बौध्दीक संपदेचे नोंदणीकरण करणार आहेत. गमतीची गोष्ट अशी की ज्या रवा केकसाठी ही बेकरी नावाजली जाते तो या बेकरीचा आयटम नाहीच आहे. हा आयटम मुंबईत आणला हरीश शेट्टी यानी! पहिली बेकरी त्यांनीच सुरु केली आणि मुंबईत आता त्यांच्या आठ बेकऱ्या आहेत. या सगळ्या घडामोडी होईस्तो आता मुंबई ठाण्यातल्या बेंगलूर अय्यंगार बेकरीची असोसिएशन पण तयार झाली आहे.

मूळ मालकाला हक्क मिळणे आता कठीणच आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required