मिशिगन सरोवराच्या किनाऱ्यावर जोरदार वाऱ्याने बनवलेल्या वाळूच्या विचित्र रचनांनी नेटिझन्सना भुरळ घातलीय!!

निसर्गाची अजबगजब किमया नेहमीच बघायला मिळत असते. काही घटना बघितल्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. अमेरिकेतील लेक मिशिगन येथे अशीच वातावरणामुळे झालेली निर्मिती लोकांना चकित करत आहे.

जोरात वारा वाहने ही तशी आता जगात नित्याची गोष्ट झाली आहे. एखादा जोरदार वारा वाहतो आणि आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी बदलून निघून जातो. लेक मिशिगन येथे सुटलेला सोसाट्याचा वारा थांबल्यावर मात्र जे चित्र निर्माण झाले ते भन्नाट होते.

निसर्गप्रेमी फोटोग्राफर जोशुआ नोविकी यांनी हा अफलातून प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर शेयर केला आहे. आता हे फोटो वायरल व्हायला वेळ लागला नाही. हे फोटो बघून हे तयार झालेले चित्र कसे निर्माण झाले याबद्दल लोकांना कुतूहल पडले आहे.

मिशिगन येथील तलावातील मातीचे तयार झालेले आकार कुणी शिल्पकाराने बनवलेल्या कलाकृती असाव्यात अशा आहे. इतका तो प्रकार भन्नाट आहे. यावेळी मात्र नेहमीप्रमाणे एलियन गॅंग सोशल मीडियावर प्रकटली. त्यांना यामागे एलियन्सचा हात दिसायला लागला.

 

तर काहींनी आपण या भागात राहत असूनही असा प्रकार आजवर कधीही घडला नसल्याचे सांगितले. काहींनी नैसर्गिक सौंदर्याची महती सांगण्याचा प्रयत्न केला. यामागील खरे कारण समोर आले आहे. किनाऱ्यावरील गोठलेली वाळू जोराच्या वाऱ्याने उडाल्यामुळे असा प्रकार घडू शकतो.

मात्र हे तयार झालेले चित्रविचित्र आकार कायमस्वरूपी राहणार नाहीत. ही घटना तातडीची होती. जेवढ्या जोरात वारा येतो तितके मोठा आकार या वाळूला येतो. एकदोन दिवसांत हे निसर्गनिर्मित शिल्प नाहीशी होतील. एक गोष्ट मात्र नक्की, जर हा प्रकार काही दिवस टिकला तर तिथे लोकांची गर्दी मावणार नाही.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required