computer

निर्भयाला न्याय मिळाला पण...इथे अजूनही तासाला चार बलात्कार होतात !!

आज निर्भयाच्या सर्व हत्याऱ्यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं. २०१२ साली घडलेल्या या घटनेला यावर्षी ६ वर्ष पूर्ण होतील.

स्रोत

६ डिसेंबर २०१२ रोजी ही घटना घडली होती. या घटनेने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वादळ उठलं. कधी नाही ती बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होऊ लागली. अनेक मोर्चे निघाले, आंदोलनं झाली, निषेध नोंदवले गेले. या सर्वांचं फळ आज मिळालं आहे.

या ६ वर्षांमध्ये खूप काही बदललं. ६ आरोपींपैकी एकाने २०१३ साली आत्महत्या केली तर एकमेव अल्पवयीन आरोपीला ३ वर्षाची शिक्षा व बालसुधार गृहात ठेवल्यानंतर २०१५ साली सुटका करण्यात आली. असं म्हणतात की हा अल्पवयीन मुलगाच या गुन्ह्यात सर्वात जास्त हिंसक होता.

स्रोत

मंडळी. ६ वर्षात बदल तर अनेक झाले पण एक गोष्ट बदलली नाही ती म्हणजे बलात्काराचं प्रमाण. भारतातील बलात्काराची आकडेवारी बघितली तरी समजतं की भारतात अनेक निर्भया आजही आहेत.

खालील आकडेवारी बघितली तर तुम्हालाही हे पटेल !!

१. २०१६ ची आकडेवारी बघितली तर देशात आजही तासाला ४ बलात्काराच्या घटना घडत आहेत.

२. मध्यप्रदेशात सगळ्यात जास्त म्हणजे ४.८८२ गुन्हे दाखल झालेले आहेत.

३. २००७ ते २०१६ हा कालखंड विचारात घेतला तर बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये ८८% वाढ झालेली आहे.

४. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट अशी की या गुन्ह्यांपैकी ४३% बलात्कार हे अल्पवयीन मुलींवर झालेले आहेत.

५. ९५% बलात्कार हे ओळखीच्या लोकांनी केले आहेत. म्हणजे त्याची आकडेवारी अशी आहे की, २९% शेजारपाजारच्या लोकांनी, २७% लग्नाची भुरळ घालून, तर इतर ३०% बलात्कार ओळखीच्या व्यक्तींनी केले आहेत.

६. २० लाखापेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या शहरांचा विचार केला तर जास्तीतजास्त गुन्हे दिल्ली शहरात घडलेले आहेत.

आकडे बदलेले असू शकतात

७. जर आकडेवारी तपासली तर नोंद झालेल्या गुन्ह्यांपैकी सिद्ध झालेल्या गुन्ह्यांचं प्रमाण आणि शिक्षा झाल्याचं प्रमाण इतर सर्व गुन्ह्यांपेक्षा कमी आहे. (ज्याला Conviction Ratio म्हणतात.)

८. जवळजवळ हीच परिस्थिती स्त्रियांबद्दल नोंदवलेल्या इतर गुन्ह्यांच्या बाबतीतही आहे.

वरील तक्त्यात स्त्रियांबद्दल नोंदवलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी दिली आहे. 

९. अधिक माहितीसाठी NCRB वेळोवेळी जी आकडेवारी प्रसिद्ध करते ती जरूर वाचा.

१०. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा असा दावा आहे की अजूनही बरेचसे बलात्काराचे गुन्हे केवळ लाजेपोटी नोंदवले जात नाहीत. आणि म्हणूनच बलात्कारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

 

मंडळी, निर्भया घटनेनंतर चित्र फारसं बदललेलं दिसत नाही. भारताला हादरवणाऱ्या त्या घटनेकडून आपण काय शिकलो हा प्रश्नच आहे.

 

आणखी वाचा :

पेरूच्या सौंदर्यवतींच्या या फिगर्सनी सर्वांना विचारात पाडलंय...नक्की कसल्या फिगर्स आहेत या ?

 

सबस्क्राईब करा

* indicates required