computer

चिकनच्या नावाने तरुण कोमातून बाहेर? नक्की काय घडलंय वाचा !!

आपल्या प्रत्येकासाठी एखादा पदार्थ असा असतोच, ज्याच्यासाठी माणूस अर्ध्या रात्री पण उठू शकतो. त्यातल्या त्यात चिकन तर काही लोकांसाठी जीव की प्राण असते. रोज जरी चिकन असले तरी नाही म्हणणार नाहीत अशी लोक देखील सापडू शकतात.

तैवान मध्ये मात्र चिकनप्रेमाची हद्दच झाली आहे. तैवान मधला चिऊ नावाचा तरुण ६२ दिवसांपासून कोमात होता. तो आज ना उद्या बाहेर येईल या आशेवर त्याचे कुटुंब होतं. पण जे डॉक्टरांना जमलं नाही ते एका चिकनने करून दाखवलं. त्याच्या कानावर एकदा फक्त चिकन हा शब्द गेला आणि तो कोमातून खडबडून जागा झाला. 

पूर्ण गोष्ट अशी, की जुलै महिन्यात चिऊला एक जीवघेणा अपघात झाला होता. ज्यामुळे तो कोमात गेला होता. ६२ दिवसानंतरही तो कोमातून बाहेर येऊ शकला नाही. त्याच्या जवळ बसलेल्या त्याच्या भावाने सहज म्हणून 'Chicken Fillet' हे शब्द उच्चारले. त्यांनतर चिऊ वेगाने उपचारांना प्रतिसाद देतोय असं दिसून आलं. Chicken Fillet म्हणजे चिकनच्या छातीकडचा भाग. हा भाग बोनलेस म्हणजे तिथे हाड नसतं त्यामुळे अनेकांना हा भाग अत्यंत आवडतो. या घटनेतून चिऊला Chicken Fillet आवडत असल्याचं दिसून येतंय. 

चिवू आता पूर्ण बरा झाला आहे आणि आता तो सामान्य माणसांसारखा चालू फिरू शकतो. उपचार पूर्ण झाल्यानंतर  काही दिवसांनी त्याने हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टरांसोबत केक देखील कापला. केकऐवजी त्याने डॉक्टरांना चिकन पार्टी द्यायला हवी होती असं लोक म्हणतायत. कोमात गेलेल्या माणसाला महत्वाची गोष्ट सांगितली की तो कोमातून बाहेर येतो या प्रकारचं कथानक असलेले हिंदी सिनेमे तुम्ही अनेकदा पाहिली असतील. अगदी आपल्या आवडत्या थ्री इडियट्समध्येही असाच एक सिन आहे. तेव्हा हास्यास्पद वाटलेली गोष्ट मात्र आज खरोखर घडली आहे. 

सबस्क्राईब करा

* indicates required