computer

त्याच्यावर तब्बल ५ लाख रुपये लहान मुलांमध्ये वाटण्याची वेळ का आली?

ग्रामीण भागात एखाद्या व्यक्तीकडे खूप जास्त पैसे असले तर उपहासाने म्हटले जाते की 'त्याच्या घरी तर पैशांना वाळवी लागत आहे.' वास्तवात कुणाच्या पैशांना वाळवी लागत नाही. पण हा समज देखील खोटा ठरेल अशी एक घटना घडली आहे.

गोष्ट आहे आंध्र प्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यातली. बिजली जमालिया नावाच्या एका माणसाला नावाप्रमाणेच पैसे जमा करण्याचा मोठा शौक होता. त्याने २०० आणि ५०० च्या अनेक नोटा जमा करून ठेवल्या होत्या.

हा भाऊ एका बॉक्समध्ये सातत्याने नोटा टाकत असे. नोटा तिथे टाकत असताना आत काय सुरू आहे हे त्याने बघितलेच नाही. जेव्हा त्याने बॉक्स उघडून नोटा बघितल्या तेव्हा सर्व नोटांना वाळवी लागलेली होती. बिचाऱ्याने घर बांधण्यासाठी हे पैसे जमा करून ठेवले होते.

बँक अकाउंट नसल्याने त्याच्यापुढे हा एकमेव पर्याय होता. एवढ्या दिवसांची मेहनतीच्या कमाईला अशी वाळवी लागलेली बघून तर त्याला मोठा धक्काच बसला. त्याच्या घरातल्या लोकांची तर रडून रडून वाईट परिस्थिती झाली.

कारण ही रक्कम थोडी थोडकी नाही तर तब्बल 5 लाख रुपये होती. आता या पैशांचे करायचे तरी काय असा विचार तो करू लागला. शेवटी त्याने सर्व पैसे गल्लीतल्या मुलांना वाटून दिले. मुले खुशीखुशीत पैसे घरी घेऊन गेली.

पण मुलांकडे पैसे कसे आले या भीतीने त्यांच्या पालकांनी पोलिसांना कळवले, तेव्हा पोलिसांनी तपास केल्यावर या वाळवी लागलेल्या पैशांची गोष्ट पुढे आली. ही गोष्ट हास्यास्पद वाटत असली तरी अज्ञानामुळे किती मोठे नुकसान होऊ शकते हेच या निमित्ताने दिसून येते.

सबस्क्राईब करा

* indicates required