भागते चोर की चड्डी ! हा...हा...हा...!!!

भागते भूत कि लंगोटी हे तुम्ही नेहमी ऐकलंच असेल पण अमेरिकेत एका चोराने हे स्वतः अनुभवले आहे. झाले असे की, हा सराईत चोर एका शाळेत चोरी करायला घुसला काटेरी तारांचे कुंपण सहज पार करून तो आत पोहोचला खरा पण शाळेतल्या कर्मचाऱ्यांना त्याची चाहूल लागल्यावर त्यांनी त्याचा पाठलाग सुरु केला. उड्या मारत तो चोर शाळेच्या गेट पर्यंत पोहोचला खरा पण त्याच्या बॅगी पँटने त्याला ऐन वेळेवर दगा दिला आणि गेट वरच्या काटेरी खिळ्यात पँट अडकली आणि तो दुसऱ्या बाजूस उलटाच पडला, पँट राहिली वर आणि चोराचे चड्डी दर्शन सगळ्यांना झाले. आता चोरी नव्हे तर चोराची चड्डी हा आंतरजालावरचा चर्चेचा आणि मनोरंजनाचा विषय झाला आहे !!!

सबस्क्राईब करा

* indicates required