ATM मशिनच्या जागी पासबुक प्रिंटींग मशीन चोरली...वाचा लुक्ख्या चोरांची कथा !!!

गोष्ट लुक्ख्या चोरांची
ऐका मंडळी...
फोटूमधी जे चार भुरटे चोर दिसतायत यांनी कदाचित चुकीच्या ठिकाणी चोरीचा कोर्स केलाय. सगळ्या चोरांची नाक कापली या लुक्ख्यांनी. मायला हद्दच केली ना राव.
तर हुआ यूं की, गुवाहाटी मधल्या या चार चोरांनी मिळून अख्खी ATM मशीन उचलण्याचा पिल्यान केला पण यांच्या बेसिक मध्येच लोचा होता. यांनी ATM मशीनच्या जागी पासबुक प्रिंटींग मशीन उचल्ली...आता बोला !!!
आता पासबुक प्रिंटींग मशीनमधनं काय डोंबलं पैसा निघतोय. हे चौघे त्या मशीनला रस्त्यात सोडून पळायला लागले अन तवाच तिथे पेट्रोलिंग करणारे पोलीस प्रगटले. मग काय पोक्कळ बांबूचे फटके !!!
यांनी खर तर विजय मल्या साहेबांकडून प्रेरना घ्यायला हवी होती. म्हणून मंडळी लक्षात ठेवा आदर्श चांगला असला मंजी काम तडीस जातं....बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल !!!