११ व्या वर्षी १२ वी पास!!

वयाच्या ११ व्या वर्षी तो पाचवीत असायला हवा होता पण तेलंगणाचा अगत्स्य जायस्वाल ११ व्या वर्षी चक्क १२ वी पास झाला आहे आणि ते सुद्धा ६३ % टक्के मार्क मिळवून!!

वयाच्या ९ व्या वर्षी एसेस्सी पास केल्यानंतर बारावीची परीक्षा देण्यासाठी अगत्स्य जायस्वालनं बोर्डाची विशेष परवानगी घेतली होती. इकॉनॉमीक्स - नागरीक शास्त्र आणि वाणिज्य विषय घेऊन बारावी उत्तीर्ण होणारा हा पहिलाच विद्यार्थी असावा  असं त्याच्या वडिलांचं- अश्वनी कुमार जायस्वाल यांचे म्हणणं आहे. त्यांच्या कुटुंबात असे शैक्षणिक विक्रम करण्याची परंपराच आहे  असं दिसतंय. त्याच्या बहिणीनंसुद्धा वयाच्या १७ व्या वर्षी पीएचडी साठी नाव नोंदवलंय. अगत्स्यचं हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. 

पण या घटनेनं काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.
केवळ उच्चांक स्थापन करण्यासाठी किंवा असे विक्रम करण्यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहित करावं का ?
१० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांची परिपक्वता या मुलांमध्ये निर्माण होते का? किंवा ती उपजत असते यावर तुम्ही विश्वास ठेवता का ?
असे विक्रम फक्त पालकांना गौरवास्पद असतात असं तुम्हाला वाटते का ?

तुम्हांला काय वाटतं, हे नक्की सांगा..

सबस्क्राईब करा

* indicates required