हुर्रे....आता व्हॉट्सअॅपवर मेसेज एडिट आणि डिलीटही करता येणार !!!

धनुष्यातून निघालेला बाण आणि व्हॉट्सअॅपवरून पाठवलेला मेसेज परत कधीच येत नाही. या म्हणीने भल्या भल्यांची वाट लावली मित्रांनो. चुकून आपला एखादा मेसेज चुकीच्या व्यक्तीकडे जातो किंवा मेसेज पाठवून आपल्या लक्षात येतं कि ‘मायला हे काय केलं’....शेवटी काय तर माफी मागत बसा...

आता या संकटातून सोडवण्यासाठी व्हॉट्सअॅपने एक नवीन फिचर लाँच केलंय मंडळी ज्यात आपल्याला मेसेज पाठवल्यानंतर एडिट अथवा डिलीटही करता येणार आहे. पण....पण....पूर्ण ऐका....मेसेज एडीट किंवा डिलीट करण्यासाठी आपल्याजवळ फक्त पाच मिनिट असणार आहेत.

Image result for @WABetaInfo revokeस्रोत

पाच मिनिटं तर पाच मिनिटं पण लय भारी झालं ना राव...

व्हॉट्सअॅप अनेक महिन्यांपासून रिव्होक (Revoke) या फिचरवर काम करत होतं...आणि येत्या नवीन वर्जन मध्ये आपल्या मोबाईल मध्ये हे फिचर येणारे याबद्दल व्हॉट्सअॅपसंबंधी ट्विटर हॅण्डल @WABetaInfo ने माहिती दिली आहे.

यामुळे अनेक व्हॉट्सअॅप किड्यांचे जीव वाचणार आहे तर मग आहे की नाही खुशखबर ???

सबस्क्राईब करा

* indicates required