नॅशनल सेल्फी डे : 10 टिप्स ज्या तुम्हाला देतील सर्वोत्कृष्ट सेल्फी!

मंडळी, सेल्फीची क्रेझ तर आजकाल प्रत्येकालाच आहे. पार्टी, समारंभातले नखरे म्हणा, किंवा फिरणं, खाणं, गाणं... अशा दैनंदिन क्रिया म्हणा... कोणतीही गोष्ट आज सेल्फी काढून पोस्ट केल्याशिवाय पुर्ण होत नाही. म्हणूनच आज नॅशनल सेल्फी डे च्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी काही महत्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत. तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा कीती चांगला आहे यापेक्षा तुमचं सेल्फी काढण्याचं तंत्र कसं आहे, हे इथे महत्वाचं असतं. 


* सेल्फी घेताना अंधारी जागा टाळून भरपूर प्रकाश असणारी जागा निवडा. खिडकीसमोर, खुल्या जागेत किंवा भरपूर लाईट्स असणार्‍या खोलीत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करा. चांगल्या सेल्फीसाठी तुमच्या चेहर्‍यावर पुरेसा प्रकाश पडणं गरजेचं आहे.

स्त्रोत

* बर्‍याच वेळा सेल्फी क्लिक करताना आपण स्क्रिनकडे बघत असतो. त्यामुळे आपल्या सेल्फी फोटोत आपण दूसरीकडे बघत असल्याचं दिसतं. याचं कारण कॅमेरा हा स्क्रिनच्या वरती असतो. म्हणूनच नेहमी सेल्फी घेताना स्क्रीनकडे न बघता फ्रंन्ट कॅमेर्‍याकडे बघा.

स्त्रोत

* सेल्फी काढण्यासाठी सर्वोत्तम वेळ असते सुर्योदय किंवा सुर्यास्त होतानाची. यावेळी हलक्या प्रकाशात तुमची सेल्फी अत्यंत सुंदर येते. याउलट उन्हात सेल्फी काढल्यास चेहर्‍यावर सावल्यांचे डाग दिसतील.

* सेल्फी घेताना फोन थेट समोर न धरता थोड्या तिरक्या किंवा वरच्या दिशेने पकडा. सोबत चेहर्‍याचा कोनही बदला. चांगल्या क्वालिटीसाठी फ्रंट कॅमेर्‍याऐवजी रिअर कॅमेरा वापरा. 

* सेल्फी घेताना तुमचा चेहरा आणि फोन यामध्ये शक्य तितकं जास्त लांब अंतर ठेवा. फोन जेवढा जवळ घ्याल तेवढात तुमच्या नाकाचा आकार मोठा दिसेल.

स्त्रोत

* सेल्फीत हसायचंच आहे तर नैसर्गीकरित्या हसा. चेहर्‍यावरचं कृत्रिम आणि जबरदस्तीने आणलेलं हसू सेल्फीमध्ये ओळखून येतं. 'डोळ्यांनी हसणं' हा जो काय प्रकार आहे तोही ट्राय कराच. 

* सेल्फी क्लिक करताना स्मार्टफोनच्या स्क्रिन वरील बटनाऐवजी वॉल्युम बटन्सचा वापर करा. ज्यामुळे फोन नीट पकडताही येईल आणि सहज सेल्फी टिपता येईल. फोटो क्वालिटी चांगली येण्यासाठी डिजीटल झूम वापरणं टाळा. सेल्फी स्टीक वापरली तर उत्तमच. 

* बर्‍याच वेळा सेल्फी काढताना हात हलतो आणि सेल्फी खराब येते. त्यामुळे नेहमी बर्स्ट मोडचा वापर करा. यामुळे एकाच क्लिकमध्ये भरपून फोटो कॅप्चर होतात आणि त्यातून योग्य सेल्फी आपण निवडू शकतो.

स्त्रोत

* सेल्फीमध्ये फक्त स्वतःला न दाखवता चांगल्या बॅकग्राऊंडचाही विचार करा. त्याचबरोबर ग्रूप सेल्फी घेणं टाळा. सेल्फीमध्ये जितक्या कमी व्यक्ती तितकीच ती सेल्फी चांगली येईल.

* आणि शेवटची गोष्ट आपल्या सेल्फी फोटोला कमीत कमी एडीट करा. फिल्टर्स आणि स्टिकर्सचा भरमसाठ वापर करणं टाळा.

मग? वाट कसली बघताय? करा की क्लिक... 

सबस्क्राईब करा

* indicates required