computer

उत्तर कोरिया नरक आहे की स्वर्ग?? किम जोंग युंगच्या कोरियाचे असे फोटो तुम्ही कधीच पाह्यले नसतील.

उत्तर कोरिया म्हणजे कोणत्याही नरकापेक्षा कमी नाही, तिथला हुकुमशहा सनकी आहे, केस कोणत्या पद्धतीने कापावे याचेही नियम असलेला हा देश आहे.... या आणि अशा अनेक बातम्या तुम्ही वाचल्या, ऐकल्या असतील. आज आम्ही जे फोटो तुम्हाला दाखवणार आहोत ते फोटो पाहून उत्तर कोरियाबद्दलच्या आपल्या समजुतींना नक्कीच धक्का बसेल.

लींगो लीन वेलिंग या फेसबुक युझरने तिच्या उत्तर कोरियाच्या भेटीच्या वेळचे फोटो शेअर केले आहेत. ती एका फोटोग्राफी ग्रुपसोबत उत्तर कोरिया पाहण्यासाठी गेली होती. उत्तर कोरियात कोणत्याही पर्यटकाला फोटोग्राफीची परवानगी नाही हे आपण ऐकून आहोत, पण लींगो लीन वेलिंग आणि तिच्या ग्रुपचा अनुभव बघता त्यांना कॅमेरा सोबत ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. लींगो लीन वेलिंगने सांगितल्याप्रमाणे तिचा हा ग्रुप उत्तर कोरियाला भेट देणारा पहिल्या फोटोग्राफी ग्रुप आहे. या ग्रुपने फक्त शहरेच नाहीत, तर उत्तर कोरियामधली गावे आणि दुर्गम भागसुद्धा पाहिले. 

फोटोग्राफी करण्यापूर्वी गाईडने  या ग्रुपला एक सल्ला जरूर दिला होता. गाईड म्हणाला की, "उत्तर कोरियाच्या जवळजवळ सर्वच सामान्य जनतेने कधीही देशाबाहेरच्या व्यक्तीला पाहिलेलं नाही. जर तुम्ही त्यांच्याकडे कॅमेरा रोखून फोटो काढत राहिलात तर ते घाबरतील. कदाचित त्यांच्यातला कोणीतरी तुमची तक्रार करेल." 

फोटो काडण्याचं एवढं स्वातंत्र्य दिलं असलं तरी काही नियम हे होतेच. पहिला नियम म्हणजे सैन्यातील कोणत्याही अधिकाऱ्याचे फोटो घ्यायचे नाहीत, तसेच अर्धवट बांधकामाचे फोटो घ्यायचे नाहीत, नागरिकांच्या जवळ जाऊन त्यांचे फोटो घ्यायचे नाहीत. खालील फोटोत एक अधिकाऱ्याचा फोटो आहे. तो अधिकारी खरं तर ग्रुपचा गाईड असल्याने त्याचा फोटो घेण्यात अडचण आली नाही. 

लींगो लीन वेलिंग म्हणते की उत्तर कोरियन लाजरे बुजरे आहेत, पण त्यांना हात दाखवला किंवा त्यांच्याकडे बघितलं तर बरेचसे लोक स्वतःहून प्रतिसाद देतात. खास करून लहान मुलांचा उत्साह पाहाण्यासारखा असतो. 

या सर्व फोटोंमध्ये अनेकांच्या उजव्या छातीवर एक लाल रंगाचा बिल्ला दिसत आहे. या बिल्ल्यावर उत्तर कोरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा फोटो असतो. प्रत्येक नागरिकाला असा बिल्ला पहिल्यांदा वयाच्या १४व्या वर्षी मिळतो. पुढे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असे बिल्ले दिले जातात. उत्तर कोरियाच्या इतिहासात झालेल्या युद्धांतून देशाला सुखरूप बाहेर काढणाऱ्या राष्ट्राध्यक्षांबद्दल आदर दाखवण्यासाठी हा बिल्ला लावण्यात येतो, पण तो बंधनकारक नाही.

लींगो लीन वेलिंग म्हणते की उत्तर कोरिया हा समाजवादी विचारांचा देश असल्याने शिक्षण, घर, वाहतूक या सुविधा मोफत आहेत. याखेरीज ती म्हणते की रस्त्यांवर भिकारी किंवा भीक मागणारी लहान मुलं दिसत नाहीत. शहरे स्वच्छ आहेत, तसेच गावे सुंदर आहेत. शहरातील लोक तसेच शाळेतील मुलं खास शेतीची कामे शिकण्यासाठी वेळोवेळी गावांना भेटी देतात. शहरातील भिंती रंगवण्यात सर्व वयांचे व्यक्ती सहभाग घेतात, इतर कोणत्याही देशातील नागरिक करतील त्याच पद्धतीने ते ही दररोजची कामे करतात.

चला तर, जास्त वेळ न दवडता उत्तर कोरियाचं वेगळं दर्शन घडवणारे हे फोटोग्राफ्स पाहून घ्या.

कोणत्याही देशातील नागरिक असावेत तसेच उत्तर कोरियाचे नागरिक दिसत आहेत. मग आजवर आपण जे ऐकलं, वाचलं ते काय होतं? कदाचित ते खोटं चित्र होतं किंवा वरच्या फोटोंमध्ये खोटं चित्र निर्माण केलं आहे आहे. तुम्ही कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवणार?

सबस्क्राईब करा

* indicates required