गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्राच्या पठ्ठ्यांनी उभारली यशाची गुढी.... UPSC चा निकाल बघून घ्या !!

आजची पहिली खुशखबर घ्या राव. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्राच्या पठ्ठ्यांनी यशाची गुढी उभारली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत पहिल्या ५० विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या ५ जणांची निवड झाली आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या ‘सृष्टी जयंत देशमुख’ हिने देशात पाचवा क्रमांक पटकावला आहे.
मंडळी, सप्टेंबर २०१८ साली लोकसेवा आयोगाची परीक्षा पार पडली होती. शासकीय सेवा (आयएएस), विदेश सेवा (आयएफएस), पोलीस सेवा (आयपीएस), गट अ आणि गट ब या पदांसाठी या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये मुलाखती घेण्यात आल्या. या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. देशभरातून ७५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पैकी महारष्ट्राचे ८५ ते ९० विद्यार्थ्यांना यश मिळालं आहे.
चला तर पाहूया महाराष्ट्रातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी आणि त्यांचे रँक :
सृष्टी जयंत देशमुख (५), पूज्य प्रियदर्शनी (११), तृप्ती अंकुश धोडमिसे (१६), वैभव सुनील गोंदणे (२५), काजल जावळे (28), मनीषा माणिकराव अवाळे (३३), हेमंत केशव पाटील (३९), स्नेहल नाना धायगुडे (१०८), सौम्या रंजन राऊत (११८), दिग्विजय संजय पाटील (१३४), आदित्य धनंजय मिरखेलकर (१५५), नचिकेत विश्वनाथ शेळके (१६७), अमित मारुतीराव काळे (२१२), योगेश अशोकराव पाटील (२३१), अभिषेक सराफ (248), सागर विजय काळे (२५४), नवजीवन विजय पवार (३१६), नेहा दिवाकर देसाई (३३२), ऋजुता दिनेश बनकर (325), स्नेहा सूर्यकांत गिते (३३१), अभयसिंह बाळासाहेब देशमुख (३६१), गोकूळ महाजन (३७३), प्रतीक खामतकर (३७७), वैभव दासू वाघमारे (४०१), शुभम ज्ञानदेवराव ठाकरे (४१२), गायत्री देवीदास हायलिंगे (४३७), सचिन प्रकाश पवार (४४४), अर्चना पंढरीनाथ वानखेडे (४४७), रणजित हरिश्चंद्र थिपे (४८०), ऋषीकेश प्रदीप रावळे (४९१), निकेतन बन्सीलाल कदम (५०१), रमानंद दराडे (६१५), मच्छिंद्र गाळवे (६४०)
देशातल्या टॉप १० विद्यार्थ्यांची नावे :
(कनिष्क कटारिया)
१. कनिष्क कटारिया.
२. अक्षत जैन.
३. जुनैद अहमद.
४. श्रवण कुमार.
५. सृष्टी जयंत देशमुख.
६. शुभम गुप्ता.
७. कर्नाटी वरुणरेड्डी.
८. वैशाली सिंग.
९. गुंजन द्विवेदी.
१०. तन्मय वशिष्ठ शर्मा.
मंडळी, यंदाच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या वाढलेली आहे आणि पहिल्या प्रयत्नात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पण वाढ झाली आहे. यावर्षी पण परीक्षेत बाजी मारण्यात इंजिनीअर्स सर्वात पुढे होते.
मंडळी, सर्व यशवंतांचं बोभाटातर्फे खूप खूप अभिनंदन !!