computer

मैत्री तुटल्याचा हा मीम चक्क ३८ लाखांना विकला गेलाय...काय आहे या मीममागची गोष्ट??

सध्या मीम्सचा जमाना आहे. तुम्ही बनवलेला एखादा मीम तुम्हाला फेमस करून शकतो. तर एखाद्यावेळीय तुम्ही स्वतःच मीम बनून पण तुम्ही फेमस व्हाल. मात्र एखाद्या मीमची चक्क बोली लागावी इतके अच्छे दिन मीमचे आले नव्हते. आता ते पण आले आहेत. 

सुरुवातीपासून सांगायचे झाल्यास पाकिस्तानातील असिफ रजा याने त्याचा दोस्त मुदासीरसोबतची मैत्री तोडून दुसरा सलमान नावाच्या दुसऱ्या मित्राला आपला बेस्ट फ्रेंड बनवले. यात तसे नविन काही नाही सगळीकडे असे होतच असते. पण पठ्ठ्याने तसा थेट फोटो एडिट केला आणि फेसबुकवर टाकला. 

या फोटोत असिफ आणि सलमान हँडशेक करत होते तर मुदासीरच्या फोटोवर फुली मारली होती. हा फोटो लगेच व्हायरल झाला. हा मीम एका स्टार्टअपने चक्क लिलावात उतरवला. मुहूर्त सुद्धा फ्रेंडशिप डेचा निवडण्यात आला. लिलावात हा मीम थोडाथोडका नव्हे तर तब्बल ३८ लाखात विकला गेला. यावर असिफ म्हणतो की, 'मी हा फोटो मुदासीरला वाईट वाटावं म्हणून पोस्ट केला होता, हा फोटो जगभर व्हायरल होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं.'  म्हणजे काय विकले जाईल याचा काही भरवसाच राहिला नाही.

ज्या मैत्री बद्दल आपण बोलत आहोत त्याची गोष्टच वेगळी आहे. असिफने कालांतराने मुदासीरला परत मित्र बनवून टाकले आणि परत एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला. सलमान आणि मुदासीर दोन्ही आता आपले बेस्टफ्रेंड आहेत असे त्याने घोषित केले. परत जर हा दुसरा मीम काही लाखांना विकला गेला तर आश्चर्य वाटणार नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required