हा लहानगा प्रशिक्षित डान्सर्सनाही लाजवेल असा थिरकतोय...हा व्हिडीओ आजचा दिवस सार्थकी लावेल !!

आजच्या जगात निरागसता हरवत चालली आहे. लहान मुलंच तेवढ्या निर्मळ मनाने जगत असतात. हे सिद्ध करणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ह्या व्हिडीओने तुम्हालाही नाचावंस वाटेल यात शंका नाही. काय आहे या व्हिडीओमध्ये? तुम्हीच पाहा!!
This made me smile pic.twitter.com/zy4P7Ujmjc
— Theo Shantonas (@TheoShantonas) June 9, 2021
रस्त्यावर एक ग्रुप गाण्यावर थिरकत होता, तेव्हा मध्येच एक लहान मुलगा आला आणि त्याने या ग्रुपसोबत नाच सुरु केला. या डान्स ग्रुपने अनेक दिवसांत मेहनत करून जुळवून आणलेले डान्स स्टेप्स हा लहानगा अगदी सहज करताना दिसतोय. त्याला नाचताना बघून लोकांनी त्याला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. व्हिडीओच्या मागे लोकांचा आवाज तुम्ही ऐकू शकता.
या व्हिडीओ वर प्रतिक्रिया देताना एकजण तर म्हणाला की, 'या व्हिडीओ मध्ये तो लहानगाच तेवढा नाचतोय, बाकीचे त्याची नक्कल करत आहेत.' Rex Chapman या ट्विटर युझरने ९ जून रोजी व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तो लगेचच व्हायरल झाला. सध्या तो चांगलाच गाजत आहे. आतापर्यंत ३४ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. याखेरीज लाखभर लोकांनी व्हिडीओ लाईक केला, तर हजारो युझर्सनी तो रिट्विट केला आहे.
इंटरनेटवर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात पण त्यातल्या मोजक्याच गोष्टी मनाला सुखावणाऱ्या असतात. हा व्हिडीओ त्यापैकीच एक आहे. तुम्हाला कसा वाटला या लहानग्याचा डान्स? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा!!