माणूस आणि पक्षी एकाच ताटात जेवतायत....ह्या दुर्मिळ क्षणाचा व्हिडीओ तर पाहायलाच हवा!!

माणूस माकड होता तेव्हापासून ते तो दोन पायांवर चालू लागला त्यानंतरही त्याचा आणि प्राण्यांचा संबंध कायम येत राहिला आहे. काळाच्या ओघाने माणूस इतर सर्वांपासून जास्त ताकदीचा झाला असला तरी त्याला प्राण्यांशी जुळवूनच घ्यावे लागते. थोड्याशा उदारतेने माणूस आणि प्राणी एकत्र नांदू शकतात.
आज हे सांगण्यामागचं कारण म्हणजे सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ फिरत आहे. हा व्हिडिओ बघून अनेकांना पशुप्रेम काय असते याचा अनुभव आला असेल. या व्हिडीओत एक व्यक्ती टेबलवर जेवत आहे. तिथे एक पक्षी येऊन बसतो. सहसा आपण बघतो की, असा एखादा पक्षी जवळ आला तर लोक त्याला हाकलतात. पण या व्हिडिओत तो पक्षी आणि टेबलावरील व्यक्ती एकाच ताटात जेवताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ मेघराज देसले याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत दिसणारी व्यक्ती त्याचे वडील असल्याचे त्याने कॅप्शनमधून सांगितले आहे. व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला. लोक कॉमेंटबॉक्समध्ये मेघराज देसले यांच्या वडिलांच्या पक्षीप्रेमाला सलाम करत आहेत.