इंग्रजांनाही धूळ चारणारी कित्तूरची पराक्रमी राणी चन्नम्मा!!
पुरुषसत्ताक समाजात स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते. आपला भारतीय समाजही याला अपवाद नाही. पण याच भारतात काही अशी राजघराणी होऊन गेली ज्यांनी स्त्रियांच्या कतृत्वाला संधी दिली आणि त्या स्त्रियांनीही आपल्या कतृत्वाचे झेंडे तितक्याच दिमाखात फडकवले.
बेळगाव जिल्ह्यातील काकती संस्थान हे आज विस्मृतीच्या पडद्याआड गेले आहे. मात्र छोट्याशा संस्थानाचा इतिहास फारच गौरवशाली आणि अभिमानास्पद आहे. या संस्थानचे राजे घुलप्पा आणि राणी पद्मावती यांच्या पोटी जन्मलेल्या राणी चन्नम्माचा हा इतिहास आजच्या काळातही तितकाच प्रेरक आहे. एक स्त्री फक्त चूल आणि मूलच नाही, तर एक राज्यदेखील समर्थपणे सांभाळू शकते, हा आशावाद जागवणारा राणी कित्तूर चन्नम्माचा हा इतिहास वाचल्यानंतर भारतीय स्त्रीवादाचे देशी पैलू समजून घेण्यास मदत होते.
कित्तूर चन्नम्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शूरवीर राणीचा जन्म २३ ऑक्टोंबर १७७८ रोजी काकती या छोट्याशा संस्थानात झाला. मुलगी झाली म्हणून खेद करत बसण्यापेक्षा राजा घुलप्पांनी आपल्या लेकीलाच वंशाचा दिवा समजून शिक्षण दिले. चेन्नम्माला बालपणीच घोडेस्वारी, धनुर्विद्या, भालाफेक अशा साहसी खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले.
कित्तूर संस्थानचे राजे मल्लसर्जा देसाई यांनी चन्नम्माचा हा धाडसी स्वभाव पाहून तिच्याशी विवाह केला. १८१६ साली मल्लसर्जा देसाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर १८२४ साली त्यांचा एकुलता एक मुलगाही गेला. पती आणि मुलाच्या निधानंतर चन्नम्मा यांनी राज्याचा वारस चालवण्यासाठी शिवलिंगाप्पा नावाच्या एका मुलाला दत्तक घेतले.
त्याचवेळी ईस्ट इंडिया कंपनी भारतात आपला साम्राज्य विस्तार करण्याच्या प्रयत्नात होती. ज्या संस्थानिकांना थेट वारस नाही अशी संस्थाने खालसा करून ती ईस्ट इंडिया कंपनीत विलीन करण्यासाठी ‘डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स’हा नवा नियम ईस्ट इंडिया कंपनीने लागू केला. या कायद्याला बरेचदा 'दत्तक वारस नामंजूर' या नावाखाली ओळखले जाते. या कायद्यानुसार चन्नम्मा राणीला देखील तिचे संस्थान खालसा करण्याचे आदेश देण्यात आले.
कंपनीच्या या कायद्याला शरण न जाता राणी चन्नम्माने मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टनला पत्र लिहून आपल्या मुलाला वारस म्हणून मान्यता देण्यात यावी अशी विनंती केली. पण राणीची ही विनंती इंग्रजांनी धुडकावून लावली. इंग्रजांनी १८४७ साली कित्तूर संस्थान खालसा केल्याचे घोषित केले. पण राणी चेन्नम्माने त्यांचा हा आदेश अजिबात मानला नाही. शेवटी २१ ओक्टोंबर १८२४ रोजी इंग्रजांनी कित्तूरवर हल्ला केला. राणी चेन्नम्माकडे त्यावेळी दीड कोटीची संपत्ती होती. ही संपत्ती लुटल्यास राणी कमजोर पडेल असा इंग्रजांचा कयास होता.

ग्रजांच्या तुलनेत कमी सैन्य बळ असूनही राणी चेन्नम्मा या लढाईत विजयी ठरली. या लढाईत इंग्रजाचा दारूण पराभव झाला होता. इंग्रजांचे दोन मातब्बर अधिकारी सर वाल्टर इलियट आणि स्टीव्हनसन यांनी तहाची भाषा बोलण्यास सुरुवात केली. राणी चेन्नम्माने युद्धबंदीच्या बदल्यात कैद केलेले सैनिक सोडून देण्याची तयारी दाखवली. एका स्त्रीकडून पराभव पत्करणे इंग्रजांना खूपच अपमानास्पद वाटत होते. म्हणून त्यांनी राणी चेन्नम्माच्या गोटातच दुफळी माजवण्याचा प्रयत्न सुरू केला. शेवटी राणीचे दोन सैनिक इंग्रजांच्या या काव्याला बळी पडले आणि त्यांनी तोफामध्ये वापरण्याच्या दारूगोळ्यात शेण आणि चिखल मिसळला. या अंतर्गत फितुरीमुळे राणी चेन्नम्माचा इंग्रजांपुढे टिकाव लागला नाही.
शेवटी तिला जेरबंद करण्यात इंग्रज यशस्वी झाले. राणी चेन्नम्माला बैलहोंगल किल्ल्यावर कैदेत ठेवण्यात आले. याच किल्ल्यावर २१ फेब्रुवारी १८२९ रोजी तिचा मृत्यू झाला. इथेच तिची समाधी बांधण्यात आली आहे.
या शूर राणीच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्यासाठी आजही ऑक्टोबर महिन्यात चार दिवसांचा कित्तूर महोत्सव साजरा करण्यात येतो.
परकीय सत्तेच्या दडपणाला बळी न जाता आपल्या जनतेचे रक्षण करण्याची तिची जिद्द आणि याकामी तिने दाखवलेला पराक्रम आजही प्रेरणादायी आहे.
मेघश्री श्रेष्ठी