computer

बाजार गप्पा - पाच निवडक समभाग -

 चार पैसे हातात असले की ते गुंतवण्याची आणि फायदा कमावण्याची इच्छा प्रत्येकालाच असते.  फुकटचे सल्ले सगळेच जण  देतात पण अभ्यास करून अंदाज वर्तवण्याची कुवत फक्त ब्रोकरेज हाऊस किंवा स्वतंत्र संशोधन करणार्‍या कंपन्यांकडे असते . बाजार गप्पांतून आपण हे अधिकृत सल्लागार काय म्हणत आहेत ते बघू या !!

स्पष्टीकरण : बाजारातील वेगवेगळे अधिकृत सल्लागार काय सल्ला देत आहेत याची माहिती या लेखात दिली आहे शेअर बाजारात गुंतवणुक कशी करावी आणि उपदेश काय द्यावा यावर सेबीचे घट्ट नियम आणि निर्बंध आहेत. 'बोभाटा' या नियमानुसार स्वतःचे असे काही सल्ले देऊ शकत नाही.  गुंतवणूक करणे किंवा न करणे हा निर्णय प्रत्येकाने ज्याचा त्याचा घ्यायचा आहे. बोभाटा कोणतीही जबाबदारी स्विकारत नाही. 

डीबी कॉर्प

डीबी कॉर्प - दैनीक भास्कर -हिंदी दिव्य भास्कर- गुजराती, दिव्य मराठी (अर्थात मराठी) या वृत्तपत्रांचे प्रकाशक असलेली कंपनी आहे. डिजीटल मिडीयामध्ये त्यांची घोडदौड जोरात चालू आहे.सिटी ब्रोकरेजच्या मते हा शेअर ४५० चा पल्ला गाठेल . आजचा खुलता भाव ३८६.८० आहे .

झी एंटरटेन्मेंट

झी एंटरटेन्मेंट : खेळते भांडवल वाढते आहे. अनेक चित्रपटांचे हक्क विकत घेण्याची मोहीम जोरात चालू आहे . सीएलएसए या कंपनीने हे समभाग घेण्याची शिफारस केली आहे .आजचा खुलता भाव ५०८ आहे.टार्गेट आहे ६२५ चे !

 इमामी

 इमामी - या कंपनीची वेगळी ओळख करून द्यावी असे काही नाही. इमामी हा ब्रँड घराघरात पोहचलेलाच आहे.मॅक्वेरी या कंपनीच्या मते हा समभाग १३०५ ची पातळी गाठेल.आजचा खुलता भाव ११४० आहे. 

 महिन्द्र अँड महिन्द्र

 महिन्द्र अँड महिन्द्र -जीप ट्रॅक्टर सारखी अनेक उत्पादने करणार्‍या कंपनीची शिफारस कोटक सिक्युरीटीज ने केली आहे. येता मान्सून सिझन कंपनीला भरघोस फायदा मिळवून देईल अशी आशा आहे. आजचा खुलता भाव -१३८५ आहे आणि १५६५ पर्यंत पोहचेल अशी अपेक्षा आहे.

 ग्रॅफाईट इंडीया

 ग्रॅफाईट इंडीया - १६५ पर्यंत या समभागाचा भाव पोहचेल अशी आशा सेंट्रम ब्रोकींग ने केली आहे आजचा खुलता भाव १४९ होता तर हा लेख लिहिताना १५८ पर्यंत पोहचला आहे. सेंट्रम पुन्हा एकदा री -रेटींग करून नवा अंदाज वर्तवणार आहे .

सबस्क्राईब करा

* indicates required