विशाखापट्टणम मध्ये दिसलेले हे दोन एलियन आहेत तरी कोण ? वाचा या व्हिडीओ मागील सत्य !!

पृथ्वी बाहेरील जीवन आणि एलियनचं अस्तित्व हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. जगात असे अनेकजण भेटतील ज्यांना एलियन दिसला आहे किंवा उडती तबकडी दिसली आहे. मंडळी जसं भूत दिसल्याची वार्ता सगळीकडे पसरते तसच एलियनच्या बाबतीत आहे. पण याबद्दल काहीही ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत.

आज एलियनची आठवण काढण्याचं कारण म्हणजे विशाखापट्टणम मधला व्हायरल झालेला एक व्हिडीओ. असं म्हटलं जातंय की या व्हिडीओत दिसणारे ते दोन जीव हे एलियन आहेत. बांधकाम चालू असलेल्या जागेत हा व्हिडीओ चित्रित केला गेला आहे. 

हे दोन जीव खरचं एलियन आहेत का ?

एका न्यूज चॅनेलने याचा तपास घेतल्यावर समजलं की हे दोन जीव एलियन नसून ‘घुबड’ आहेत. माणसांना हे जीव एलियन वाटण्याचं कारण म्हणजे त्यांना पंख नाहीत. खरं तर ही घुबडे अजून पिल्लं असल्याने त्यांना पंख असणं शक्य नाही. जेव्हा हे घुबड मोठे होतील तेव्हा त्यांना पंख फुटतील.

पांढऱ्या रंगातील हे अनोखे घुबड दक्षिण भारतात आढळतात. यांची खासियत म्हणजे जेव्हा यांना धोक्याची सूचना मिळते तेव्हा ते सावधान पवित्र्यात जातात, जसे की व्हिडीओ मध्ये दिसत आहे. यावेळी जमलेल्या माणसांमुळे सुरक्षेसाठी घुबड सावधान झाले आणि लोकांना ते एलियन असल्याचा भास झाला.

मंडळी हा व्हिडीओ फेसबुक, व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे.आश्चर्य म्हणजे तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या लोकांना यात दिसणारे जीव हे एलियन असल्यावर विश्वास देखील बसला आहे.
म्हणूनच व्हायरल होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेऊ नका भौ !!

सबस्क्राईब करा

* indicates required