computer

मुलगा विकायला उभा राहिलेला बाप - काय घडलं आणि का घडलं असं ?

आईवडिलांनी आपल्या मुलांना विकले ही गोष्ट कधीही कानावर आली तर मानवी मनाला वेदना होतात. कोणताही पालक आपल्या मुलांना आपल्यापासून दूर होऊ देण्याचा विचार करूच शकत नाही.जे असे करतात त्यांच्याबद्दल संतापच लोकांच्या मनात असतो.पाकिस्तानात एक बाप रस्त्यावर आपल्या मुलाला विकण्यासाठी उभा असल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. यामागील कारण जाणून मात्र कुणीही हळहळेल.

पाकिस्तानच्या रस्त्यावर निसार लाशरी नावाचा व्यक्ती आपल्या सहा वर्षांच्या मुलाला ५० हजारांत विकण्यासाठी उभा आहे. हा निसार पाकिस्तान जेल विभागात पोलीस आहे. असे करण्यामागील कारण समोर आले आहे. 
 

निसारला आपल्या मुलाच्या उपचारासाठी सुट्टी हवी होती. त्याच्या वरिष्ठाने सुट्टी देण्याच्या बदल्यात लाच मागितली. लाच देऊ न शकल्याने निसारची थेट १२० किलोमीटर दूर बदली करण्यात आली. निसार म्हणतो की माझ्याकडे प्रवासासाठी सुद्धा पैसे नाहीत तर मी पैसे कुठून देऊ? याच मनःस्तापातून तो रस्त्यावर उभा राहिला. 

हा व्हिडिओ मात्र लगोलग वायलर झाला. लोकांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली. एका बापाला आपल्या मुलाच्या उपचारासाठी जर लाच देऊन सुट्टी मिळत असेल तर व्यवस्था काय कामाची अशी जोरदार टीका होऊ लागली. हा व्हिडिओ आणि ही घटना थेट पाकिस्तानातील सिंध प्रांताच्या मुख्यमंत्र्यापर्यंत गेली.

निसारची बदली रद्द करण्यात आली आणि त्याला आपल्या मुलाच्या उपचारासाठी १४ दिवसांची सुट्टी देण्यात आली. निसारला केलेल्या सत्याग्रहाचा फायदा होऊन सुट्टी मिळाली असली तरी व्यवस्थेत शिरलेल्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा त्रास मात्र कुठेही गेले तरी सारखाच असतो हेच यातून दिसून येते.

सबस्क्राईब करा

* indicates required