२६ डिसेंबरला 'बॉक्सिंग डे' का म्हणतात...कारण माहित आहे का ?

मंडळी, काल ख्रिसमस होता आणि आज आहे ‘बॉक्सिंग डे’. २६ डिसेंबर हा दिवस बॉक्सिंग डे म्हणून साजरा केला जातो....एक मिनिट...ख्रिसमसनंतर आज बॉक्सिंग डे आहे म्हणजे काय? डब्ल्यूडब्ल्यूवाल्यांचा दिवस का? आजच्या दिवसी बॉक्सिंग बॉक्सिंग खेळायची असते का...? असले प्रश्न तुम्हाला पडले असतीलच, पण राव थांबा की!! तुमच्या प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे आहेत.

ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवसाला बॉक्सिंग डे का म्हणतात,  ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया मग !!

स्रोत

बॉक्सिंग डे म्हणजे भेटवस्तू एका सजवलेल्या बॉक्समध्ये ठेवून त्या दुसऱ्यांना भेट देणे. याची सुरुवात झाली ब्रिटनमध्ये. या दिवसाला ‘सेंट स्टीफन्स डे’ म्हणूनही ओळखलं जातं. या दिवशी सर्वांना सुट्टी असते.
'बॉक्सिंग डे'चा मूळ उद्देश गरिबांना पैसे आणि भेटवस्तू देणे हाच दिसून येतो. याचं पाहिलं उदाहरण म्हणजे ब्रिटनमध्ये त्याकाळात ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी घरातल्या सर्व नोकरांना एक बॉक्स दिला जायचा. यामध्ये त्यांच्यासाठी पैसे किंवा भेटवस्तू असायची. बॉक्स दिल्यानंतर त्यांना सुट्टी दिली जायची. ख्रिसमसचा आनंद वाटण्याचा हा वेगळा प्रयत्न त्याकाळात प्रचलित होता.

दुसरं उदाहरण म्हणजे चर्चमध्ये ख्रिसमसच्या आधी एक बॉक्स ठेवला जायचा. या बॉक्समध्ये प्रत्येक माणूस त्याच्या ऐपतीनुसार पैसे किंवा वस्तू टाकायचा. या सर्व गोष्टी ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी गरीबांमध्ये वाटून टाकण्यात यायच्या.

याशिवाय चर्चला आणखी एक भेटींनी भरलेला बॉक्स मिळायचा. या भेटी असायच्या जहाजावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून.  जहाजातून सफर करणारे लोक  आपला प्रवास सुखकर व्हावा म्हणून जहाजावर एक बॉक्स ठेवायचे.  या बॉक्समध्ये भेटवस्तू असायच्या. जेव्हा जहाज सुखरूप किनाऱ्यावर लागायचं, तेव्हा हा बॉक्स जवळच्या चर्चला देण्यात यायचा. यानंतर चर्चचा पाद्री या बॉक्समधल्या सर्व भेटी गरीब लोकांमध्ये वाटून टाकायचा. 

ग्रामीण भागातल्या खेळांच्या सामन्यामुळे या दिवसाला बॉक्सिंग डे म्हणतात,  असा एक समज होता.  पण याचा सरळ अर्थ होतो बॉक्समध्ये ठेवलेल्या भेटी वाटण्याचा दिवस.

सबस्क्राईब करा

* indicates required