जाणून घ्या वर्तमानपत्राच्या तळाशी हे चार ठिपके का असतात !!!

मंडळी आपल्यातील बहुतेकजण वर्तमानपत्र वाचत असतील. प्रत्येक वर्तमानपत्राची मांडणी, बातम्या, जाहिराती ह्या वेगवेगळ्या असू शकतात पण एक गोष्ट आहे जी सगळ्या वर्तमानपत्रात समान दिसून येते.  ती

म्हणजे वर्तमानपत्राच्या तळाला असलेले चार रंगातील ठिपके !! कधी विचार केला आहे का, की हे रंग तिथे का असतात ? नाही ? मग चला जाणून घेऊया वर्तमानपत्रात हे रंगीत ठिपके का असतात !!

तर मंडळी, आपल्याला लहानपणी सांगितलं जातं की मुख्य रंग हे तीन असतात. निळा, लाल आणि पिवळा. तुम्ही जर बघितलं तर वर्तमानपत्रात हे ठिपके याच क्रमाने असतात. याशिवाय आणखी एक रंग यात सामील असतो. तो म्हणजे काळा !! तुमच्याकडे जर प्रिंटर असेल तर त्यात रंगांचा क्रम सुद्धा असाच असल्याच तुम्हाला दिसेल.


स्रोत

हे चार रंग ‘CMYK’ क्रमात असतात.

१. C म्हणजे Cyan – निळा
२. M म्हणजे Magenta – गुलाबी
३. Y म्हणजे Yellow  - पिवळा
४. K म्हणजे Black – काळा

याच चार रंगांच्या आधारे वर्तमानपत्रांची छपाई केली जाते. छपाई करताना ‘कलर पॅटर्न’ बरोबर बनवण्यासाठी या ठिपक्यांचा उपयोग होतो. जर हे ठिपके याच क्रमात असतील तर चित्र बरोबर येतं. नाहीतर चित्रातील रंग पसरलेले दिसतात. छपाईच्या आधी यांच स्थान निश्चित केलेलं असतं आणि जर छपाई नंतर सुद्धा हे स्थान जसंच्या तसं असेल, तर समजायचं की छपाई ‘परफेक्ट’ झाली आहे.

काय राव, ज्ञानात थोडी भर पडली की नाही ?

 

 

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) 
©बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required