माहीतीये का, रस्त्याच्या कडेने उभ्या असणाऱ्या झाडांना लाल-पांढर्‍या रंगाने का रंगवतात?

मंडळी, आपण नेहमी पाहतो की बर्‍याच रस्त्यांच्या दुतर्फा लावलेल्या झाडांची खोडं ही रंगवलेली असतात. पण ती का रंगवली जातात, याचं कारण, त्यामागचा हेतू तुम्हाला माहीतीये का? नाही? या मग जाणून घेऊया...

या पांढर्‍या रंगाचं प्रमुख काम असतं त्या झाडाचं रक्षण करणं. हा रंग त्या खोडाच्या सालीमध्ये भेगा तयार होऊ देत नाही. कारण जर खोडाच्या सालीमध्ये भेगा पडल्या तर त्यात बुरशी आणि कीड लागते. त्यामुळे संपूर्ण झाडालाच धोका निर्माण होतो. म्हणूनच हा पेंट लावून त्या झाडांना किडीपासून वाचवलं जातं.

स्त्रोत

या रंगाचा असाही अर्थ होतो की या पेंट केलेल्या झाडांची देखरेख स्थानिक प्रशासनाकडून कींवा वन प्रशासनाकडून केली जातेय आणि ती संरक्षित आहेत. पांढरा रंग लावण्याचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे वाहनचालकांना रात्रीच्या अंधारातही ती झाडे दिसावीत, असा असतो. 

कुठे फक्त पांढरा लावला जातो तर कुठे लाल - पांढरे किंवा निळे - पांढरे पट्टे ओढलेले असतात. पण या सगळ्यामागची कारणं मात्र एकच आहेत. आता माहीती आवडली तर शेअर करायला विसरू नका...

सबस्क्राईब करा

* indicates required