computer

या बेटावर पुरुषांना प्रवेश नाही, जाणून घ्या काय कारण आहे ते..

सहसा महिला आणि पुरुष यांना सगळ्याच ठिकाणी मुक्त प्रवेश मिळत असतो. पण एक ठिकाण असे आहे जेथे पुरुषांना एंट्रीच नाही. ते पण साध्यासुध्या ठिकाणी नाही राव!! चक्क एका बीचवर. हो मंडळी, एका बीचवर फक्त महिलांचे राज आहे. त्या जागेचे नाव आहे सुपरसी आयलँड!! सुपरसी आयलँड फिनलँडच्या बाल्टिक समुद्राजवळ आहे. आयलँडचे ओपनिंग याचवर्षी झाले आहे. जवळपास ९ एकर परिसरात पसरलेले हे बेट  ऑस्ट्रेलियातील उद्योजक क्रिस्टिना रॉथ यांनी विकत घेतले कली आहे. 

या बाईला पुरुषांशी काय दुष्मनी आहे काय माहित राव!! तिने तिच्या बेटावर पुरुषांना यायला बंदी घातली आहे. हे बेट फक्त महिलांना सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी आणि मनमोकळेपणे मौजमस्ती करता यावी म्हणून बनविण्यात आले आहे. 

या आयलँडच्या मालकीन बाई क्रिस्टिना रॉथ यांचे म्हणणे आहे की बरेच ठिकाणी महिलांना मनसोक्त जगता येत नाही.  टुरिस्ट स्पॉटवर पुरुष जास्त प्रमाणात फिरायला येत असल्याने महिलांच्या मौजमजेवर मर्यादा येतात. म्हणून क्रिस्टिना अशा जागेच्या शोधात होत्या जिथे फक्त महिलांना एन्जॉय करता येईल. 

त्या पुढे असे पण सांगतात की हे आयलँड महिलांना फक्त मौजमस्ती करण्यासाठीच आहे असे नाही. इथे त्यांना फिटनेस आणि न्यूट्रिशनसंबंधी समस्यांवरसुद्धा उपाय सांगण्यात येतील. महिलांचे आयुष्य धावपळीचे असते. त्यात त्यांना थोड़ा आराम मिळावा आणि त्यांचे आरोग्य पण चांगले रहावे म्हणून हा प्रयत्न असल्याचे त्या सांगतात. 

मंडळी,  भविष्यात हे बेट मोठे करण्यात येणार आहे. सध्या तेथे एका रिसॉर्टचे काम सुरु आहे. या रिसोर्टमध्ये महिलांना स्पा, सोना बाथ, ब्यूटी पार्लर अशा सगळ्या सोयी सुविधा देण्यात येतील. या सगळ्या रिसोर्टची रचना हेल्थच्या समस्या पण सोडविता याव्या या पद्धतीने करण्यात येत आहे.

मंडळी,  या रिसोर्टमध्ये  महिलांनासुद्धा सहजा सहजी प्रवेश मिळत नाही राव!! आधी त्यांचा इंटरव्यू होतो, मगच प्रवेश मिळतो. क्रिस्टीना बाई सांगतात की त्यांना पुरुषांचा राग नाही. फक्त महिलांना पण त्यांची प्रायव्हसी मिळावी हा हेतू आहे.

मग, ताई-माई-आक्का, कधी जायचं या फक्त स्त्रियांच्या बेटावर फिरायला??

सबस्क्राईब करा

* indicates required