व्हिडिओ ऑफ द डे - नंदादेवीवर गेलेल्या गिर्यारोहकांच्या आयुष्यातले शेवटचे क्षण..

या वर्षीच्या मे महिन्यात नंदादेवी ईस्ट हे गिरीशिखर पादाक्रांत करण्याच्या प्रयत्नात असताना आठ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला.  त्यांचे निष्प्राण देह गेल्या महिन्यापर्यंत हाती लागले नव्हते.  या जुलै महिन्यात १९००० फूट उंचीवरून त्यापैकी सात मृतदेह  ताब्यात घेण्यात इंडो तिबेटन पोलीस दलाला यश आले आहे. त्यांच्या मिळालेल्या सामानात त्यांच्या जीवनाचे ते शेवटचे क्षण एका कॅमेऱ्यावर टिपले गेले आहेत.

हे आठ गिर्यारोहक साखळी बनवून दोराच्या साहाय्याने हळूहळू शिखराकडे कूच करताना त्यात दिसत आहेत. सर्वत्र संधीप्रकाश पसरला आहे. वादळ घोंघावण्याचा भयकारी आवाजही या क्लिपमध्ये ऐकू येतोय. दोन मिनिटाच्या क्लिपचा शेवट त्या गिर्यारोहकांच्या जीवनाचा शेवटचा क्षण आहे. इंडो तिबेटन बॉर्डर पोलिसांनी काल प्रकाशित केलेल्या एका विडिओ क्लिपमध्ये हे त्यांचे शेवटचे क्षण बघायला मिळाले आहेत.

 

 मोहिमेवर जाण्यापूर्वी गिर्यारोहकांचा फोटो-स्रोत

सबस्क्राईब करा

* indicates required