बायकोसमोर चर्चेत तुम्हांला तोंड उघडण्याची संधीच मिळत नाही? या बाईंनी टीव्हीवर केलेला उपाय तुम्हीही करून पाहा..

टिव्हीवरील चर्चा कधीकाळी मेंदूला खाद्य म्हणून बघितली जात असे. नंतर मात्र या चर्चांमध्ये कधीकधी गल्लीतली भांडणे बरी वाटावी इतकी विचित्र परिस्थिती दिसते. आता आजवरचे किस्से चिल्लर वाटावे असा भन्नाट किस्सा घडलाय.

एका बंगाली टिव्ही चॅनेलवर चर्चा सुरू होती. तुम्ही बऱ्याचवेळा बघितले असेल तर एखाद्याला चर्चा सुरु असताना बोलण्याची संधी मिळाली नाहीतर सदर व्यक्ती आरडाओरडा करते. मात्र यावेळी एका बाईंनी वेगळा मार्ग निवडला. आपल्याला बोलण्याची संधीच मिळत नाही हे बघून त्यांनी चक्क अँकरचे लक्ष वेधण्यासाठी डान्स सुरू केला.

या महिला पर्यावरण विषयावरील तज्ञ आहेत. रोशनी अली असे त्यांचे नाव असून दिवाळीला फटाक्यांवर बंदी आणली पाहिजे की नाही हा चर्चेचा विषय होता. या रोशनीबाईंनी जोवर कोरोना सुरू आहे तोवर फटाक्यांवर बंदी घालावी अशी याचिका कोलकाता उच्च न्यायालयात केली होती. या बाईंचे म्हणणे आहे की फटाके प्रदूषण वाढवतात आणि ज्यामुळे कोरोनास खतपाणी मिळेल.

आता याच विषयावर या बाईंना आपली बाजू मांडण्यासाठी टिव्हीवर आमंत्रित करण्यात आले होते. आता त्यांना त्यांचा मुद्दा मांडण्याचीच संधी मिळत नाही हे बघून त्यांनी संतापाच्या भरातच डान्स सुरू केला. हा व्हिडिओ तसा थोडा जुना असला तरी एकाने ट्विटरवर पोस्ट केल्याबरोबर तो व्हायरल झाला.

टिव्हीवर लोकांना असे किस्से बघायची सवय असली तरी हा प्रकार निश्चितच काहीसा वेगळा असल्याने नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required