NRI जावयासाठी ३६५ पदार्थांचा थाट!! पाहा कुठे काय घडले आहे हे..

भारतात जावयाचा वेगळाच थाट असतो. सासरेबुवांच्या घरी गेल्यावर त्याना केला जाणारा पाहुणचार बघितल्यावर भावाने काय युद्ध जिंकले की काय असा प्रश्न बघणाऱ्यांना पडतो. काही जावईबापूंनाही असाच थाटमाट अपेक्षित असतो. सासरेबुवांच्या घरी लग्न किंवा इतर कार्यक्रम असला आणि जावाईबापूंची चांगली खातिरदारी केली नाही तर जावईही रुसून बसतात.

आंध्रप्रदेशातील एका कुटुंबाने मात्र देशातील समस्त जावई जमातीला आनंद होईल आणि सासरेबुवांच्या टेंशनमध्ये भर पडेल असा थाट केला आहे. संक्रांतीचे निमित्त साधून जावयाला थेट ३६५ पक्वानांचा स्वयंपाक केला होता. हा थाट जावई किती खुश झाला असेल हे वेगळे सांगायला नको.

आंध्रात मकरसंक्रांतीच्या काळात भोगी संक्रांती कनूमा साजरी केली जात असते. विविध ठिकाणी नोकरीला असणारे लोक यावेळी आपापल्या गावी परततात आणि कुटूंबांसोबत हा सण साजरा केला जातो. पश्चिम गोदावरी येथील नर्सापरम येथील एका कुटूंबाला आपल्या होणाऱ्या जावयाचा चांगला पाहुणचार करायचा होता, तो त्यांनी ३६५ पदार्थांची रेलचेल करून साजरा केला. या ३६५ डिशेसमध्ये करी, राईस, बिर्याणी, पारंपरिक गोदावरी स्वीट, विविध फळे यांचा समावेश होता. या कुटुंबाने दिवसाला एक पदार्थ याप्रमाणे वर्षाभराचे ३६५ पक्वान्ने एकाच दिवशी बनवून जावयाचा वर्षभराचा पाहुणचार एकाच दिवसात करुन टाकला. साहजिकच या ३६५ पदार्थांचा फोटो देशभर वायरल झाला. .

आता असा थाट करणारे कुटुंबही श्रीमंत असणार हे वेगळे सांगायला नको. अत्यम व्यंकटेश्वर राव हे या जावईबापूंचे सासरे आहेत. त्यांचा सोन्याचा बिझनेस आहे. त्यांची मुलगी कुंडवी हिचे लग्न साईकृष्णा नावाच्या मुलाशी ठरले होते आणि या सणानंतर लगेच त्यांचे लग्न झाले आहे. मुलीच्या आजी आणि आजोबांनी हा शाही थाट आयोजित केला होता. लग्नाच्या सर्व तयारी सूरु असताना दोन्ही कुटूंबातील सर्व लोक या शाही मारंभात सहभागी झाले होते.

गंमतीचा भाग सोडला तर एकूणातच आंध्रामध्ये जावईबापूंचे अतिलाड करण्याची परंपरा आहे. तिथे लग्नात हुंडाही बराच घेतला जातो. जसं शिक्षण आणि नोकरी, तसा हा हुंडाही वाढत जातो. त्यामुळे शाळेच्या वयातच आयआयटी प्रवेशासाठी तयारी, नंतरही नसलेला अनुभव दाखवून, आपल्याजागी दुसऱ्याच कुणाला मुलाखतीला पाठवून नोकरी मिळवणे असे प्रकार करण्यासाठी तिथले लोक सगळीकडे प्रसिद्ध आहेत. या घटनेतले जावई खुद्द NRI, त्यातच सासरेही सोनेव्यापारी म्हटल्यावर आदरातिथ्य असं प्रचंड आणि भव्य होणार हे झालंच.

अशा समारंभाबद्दल तुम्हांला काय वाटते हे आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये कळवा.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required