भाऊ आपण ३७०० वर्षांपासून इमोजी वापरतो !!

फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपवर आपण एकमेकांना दिसत नाही पण आपला हसणं, रडणं, आपल्या भावना समोरच्यांना कळाव्यात म्हणून इमोजीची भन्नाट कल्पना काढण्यात आली. गोल गोल आकाराच्या इमोजींचा आपण रोजचं वापर करतो. पण मंडळी नुकतच एक संशोधनात माहित पडलंय की जगातली सर्वात जुनी इमोजी तब्बल ३७०० वर्ष जुनी आहे.

Image result for The world's first emoji 3700 year oldस्रोत

टर्कीत सीरियाच्या बोर्डर जवळील पुरातत्वशास्त्रज्ञ खोदकाम करत असताना त्यांना तीन मडकी व सुरई सापडली आणि आश्चर्य म्हणजे या तीनही वस्तूंवर नीट बघितलं असता स्माईलच्या आकाराचं चित्र काढलेलं दिसत होतं. या पुरातन वस्तूंचा काळ काय असावा यावर संशोधन केल्यानंतर समजलं की तो इसवी सन पूर्व १७०० वर्ष मागे जात आहे. म्हणजे साधारण ज्यावेळी भारतात वैदिक काळ चालू होता.

सिरीयातल्या ‘कार्केमेश’ येथे एका भुयारात हि स्माईली असलेली भांडी सापडली असून त्याच बरोबर काही धातूच्या वस्तू देखील शास्त्रज्ञांच्या हाती लागल्या आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required