जगातली सगळ्यात महाग पर्स...24 कोटींची पर्स विकत घेणार का ?

‘उंचे लोग, उंची पसंद’ म्हणजे काय हे या ‘पर्स’ कडे बघून कळेल राव. आता तुम्ही म्हणाल, 'त्यात काय एवढं? तिला काय सोनं लागलंय व्हय?' तर मंडळी या पर्सला सोनं लागलं नसून तब्बल ४५०० हिरे जडले आहेत. आणि म्हणूनच या पर्सची किंमत आहे ३.८ मिलियन डॉलर्स म्हणजेच २४ कोटी ७२ लाख रुपये !!

दिवसा ढवळ्या तारे दिसले ना ?


स्रोत

मंडळी, बातमी अशी आहे की १० कारागिरांनी ८,८०० तास (१००१ रात्री) सतत काम करून ही हँडबॅगला तयार केली आहे. २०१० साली ही पर्स २.९ मिलियन युरोंना विकली गेली होती. आता ती पुन्हा एकदा विकण्यासाठी सज्ज आहे. जगातील सर्वात महागडी हँडबॅग म्हणून या पर्सचा नाव लौकिक आहे.

हॉंगकॉंगमधल्या एका प्रदर्शनात ही बॅग ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर जिनीव्हा आणि इंग्लंडमार्गे तिची विक्री केली जाईल.

पण आम्ही काय म्हणतो, आपली ती पाचशे सहाशेवाली बॅगच बेश्ट आहे राव. चोरी होण्याचं झंझट नाही, कुठेपण घेऊन फिरा..  आणि कसंय, एवढ्या मोठ्या किमतीला बॅग विकत घेतल्यानंतर सगळे पैसे तर संपतील.  मग पर्समध्ये काय ठेवायचं ? डोंबल ?

सबस्क्राईब करा

* indicates required