हा गुलाबी हिरा विकला गेलाय तब्बल ४५० कोटी रुपयात !!

“प्रिन्सीची कथा...एका राजपुत्राची शोकांतिका !!” या लेखात आम्ही ‘प्रिन्सी’ नावाच्या एका गुलाबी हिऱ्याबद्दल माहिती दिली होती.

असाच एक ५९.६० कॅरेट्सचा ‘पिंक स्टार’ डायमंड हॉंगकॉंग विकला गेलाय.  हा गुलाबी हिरा तब्बल ७१.२ मिलियन डॉलर्स म्हणजेच ४५० कोटी ला विकला गेला आहे. संपूर्णपणे पॉलिश आणि तयार असलेला हा पहिलाच हिरा आहे जो इतक्या प्रचंड बोलीने विकला गेला.हॉंगकॉंगमधील Chow Tai Fook या ‘ज्वेलरी फर्म’ चे चेअरमन ‘हेन्री चेंग-कर-शू’न या विक्रेत्याने पिंक डायमंडवर सर्वात जास्त बोली लावली. या हिऱ्याची हॉंगकॉंगमधील किंमत तब्बल ५५३ मिलियन डॉलर्स एवढी आहे. या आधी जिनीव्हामध्ये हा हिरा २०१३ साली ८३ मिलियन डॉलर्सला विकला गेला होता.

 


स्रोत

हिऱ्याला त्याचा गुलाबी रंग कसा मिळतो ?

साधारणपणे हिरा हा पारदर्शी आणि रंगहीन असल्याचं आपल्याला माहित असतं पण काही हिऱ्यांना नैसर्गिकपणे गुलाबी रंग मिळालेला असतो. यामागील कारण म्हणजे अंतर्गत स्फटीकीय संरचने मध्ये झालेला फरक आणि रासायनिक अशुद्धी. यातील थोड्याफार फरकाने निळा किंवा हिरवा रंगही येण्याची शक्यता असते. अश्या हिऱ्यांना अंतरार्ष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. (यातील सर्वात दुर्मिळ हिरा म्हणजे लाल रंगातील हिरा.)

मंडळी आता हिऱ्याचा विषय निघालाच आहे तर वाचूयात ‘इंदूर पिअर्स’ या हिऱ्यांची कहाणी :

रक्तरंजित सूडाची कहाणी...भाग एक !!!

रक्तरंजित सूडाची कहाणी...भाग दोन !!!

सबस्क्राईब करा

* indicates required